Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन तरुणींना ड्रग्जसोबत दारु पाजून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील राजगुरुनगर परिसरात शुक्रवारी (17) ही घटना घडली आहे. अत्याचार करण्यात आलेल्या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. राजगुरुनगर शहरात भयानक आणि किळसवाणी घटना घडल्याने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. या प्रकरणी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आणि अत्याचार करणा-या दोघांवर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अत्याचार करणाऱ्या दोघे खेड पोलिसांच्या ताब्यात
अधिकची माहिती अशी की, पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींला ड्रग्जचे इंजेक्शन देऊन अत्याचार करण्यात आलाय. ड्रग्ज सोबत मद्य पाजून लॉजवर अमानुषपणे अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचार करण्यात आलेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. ड्रग्ज पुरवठा करणारा आणि अत्याचार करणा-या दोघांवर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अत्याचार करणाऱ्या दोघांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुली नशेत घरी पोहचल्यावर घटना समोर आली आहे. दरम्यान, राजगुरुनगर पोलीसांकडून दोघांना अटक एक जण फरार झालाय.
पिंपरी चिंचवडमध्ये गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार
दरम्यान, आज दुपारीच पुण्यातून एक विकृत आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. नराधम नवऱ्याने पत्नीला आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील वाकड येथून उघडकीस आला होता. ही घटना ताजी असतानाच आता राजगुरुनगरमधून ड्रग्ज देऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या