Eknath Shinde : शिवाजी पार्क मैदानात गर्व से कहो हम हिंदू ही डरकाळी घुमत होती, पण आता उबाठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली  आहे. उबाठाला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे, मतांसाठी लाचारी सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. माणूस किती बदलला हे पाहू शकतो, पण इतक्या वेगाने रंग बदलताना सरडा पाहिला नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे रंग बदलणारा सरडा असल्याची टीका केली. 



बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार नाही


एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार नाही. तुम्ही आता बाळासाहेबांचा नाव घेण्याचा अधिकार सोडलेला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये उबाठा लोळत आहेत, बिघडलेलं पोरगं चुकीच्या वाटेला लागलं असं आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोदी यांनी गेल्या पाच वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मोदी यांनी गेल्या 10 वर्षात एकही सुट्टी घेतली नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी जीवन आपल्या देशाला समर्पित केलं  असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या