पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात कोण, कधी, काय,(Pune crime) करेल याचा नेम उरला नाही आहे. लहानपणीच्या मित्रानेत एका तरुणीसोबतच्या मैत्रीचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे विश्वास नेमका कोणावर ठेवायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला सून पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख Asif Rahim Shaikh (वय-26 रा. मुपो. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक दोन दिवस नाही तर जुलै 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत वाघोली येथील हॉटेलमध्ये घडला आहे आणि सोबतच आरोपीच्या भावाच्या घरी घडला आहे.
ही तरुणी आणि आरोपी असलेला तरुण बालपणीचे मित्र आहेत. त्या मित्राने आपल्याच जवळच्या मैत्रिणीला तिचे आणि त्याचे काही फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तुझ्या मामाला ठार मारण्याचीदेखील धमकी दिली होती. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. काही महिने या तरुणाने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.
पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ
पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर सलग 15 दिवस लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. लैंगिक अत्याचार करुन मुलीला आई-वडिलांना कोयत्यानं मारुन टाकण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला गेला. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली होती.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेच्या विरोधात उरळी कांचनमध्ये बंदची हाकही दिली होती. मुलीची आई मंगळवारी (11 जुलै) रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला होता. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला. मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :