एक्स्प्लोर

फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूकीचा आरोप; पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकरांविरोधात गुन्हा दाखल

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅटच्या व्यवहारात 2 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर गौतम पाषाणकर यांच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी दोन कोटी 40 लाख रुपये घेऊनसुद्धा फ्लॅट नावावर केला नाही, याप्रकरणी जाब विचारल्यानंतर कार्यालयात बोलावून मारहाण केली अशी फिर्याद तक्रारदारानं शिवाजीनगर पोलीस स्थानकात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम पाषाणकर यांच्यासह रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

पुण्यातील मोठ्या उद्योजकांच्या यादीत गौतम पाषाणकरांचं नाव आघाडीवर असतं. काही दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झाल्यामुळं गौतम पाषाणकर चर्चेत आले होते. त्यांच्या घरी एक चिठ्ठीही ठेवली होती. जवळपास 20 ते 25 दिवसांनी पोलिसांनी बाहेरच्या राज्यातून त्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा पुण्यात आणलं होतं. याप्रकरणानंतर गौतम पाषाणकर पुन्हा चर्चेत आले आहेत, ते फसवणूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळं. 

गौतम पाषाणकर यांच्याविरोधात पसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीनं ही तक्रार दिली आहे. तक्रारदार व्यवसायिक आहेत. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. यादरम्यान गौतम पाषाणकर यांनी आर्थिक फायदा व्हावा, यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना खरडीत सुरु असलेल्या मे. प्रोक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या बहुमजली बांधकाम इमारतीमधील दोन फ्लॅट दिले. या फ्लॅटचा व्यवहार ठरला आणि करारनामा देखील झाला केला. 2 कोटी 87 लाख रुपयांना या दोन फ्लॅटचा व्यवहार ठरला होता. त्यांनी 2 कोटी 40 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅटचा ताबा आणि नोंदणीकृत दस्तावेज तयार केले नाही. तर फ्लॅटचे खरेदीखत देखील त्यांच्या नावावर केलं नाही. हे दोन्ही फ्लॅट दुसऱ्याच दोन व्यक्तींच्या नावावर केले. 

सर्व बाबी लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी याबाबत पाषाणकरांकडे विचारपूस केली. त्यावेळी गौतम पाषाणकर यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावलं. तक्रारदार तिथे गेल्यानंतर आरोपी आणि त्यांच्या नोकरांनी त्यांना बेदम मारहाण केली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या मारहाणीत पायही फ्रॅक्चर झाल्याचं तक्रारदारांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
NEET UG Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
NEET UG Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र,
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget