पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक होती. मात्र पुणे पोलिसांच्या (Pune Police) तावडीतून महिला आरोपीने (Female accused) पलायन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) महिला पोलीस शिपाई (Female Police Constable) ताराबाई गणपत खांडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आल्यानंतर भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी आरोपी धुरपता भोसले हिला दागिने चोरताना रंगेहाथ पकडून हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांच्याकडे देण्यात आली होती.
महिला पोलीस शिपाई निलंबित
आरोपीस खोलीत बसवून खांडेकर दुसरे काम करत होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवून आरोपीने पोलीस ठाण्यातून पळ काढला. ती पसार झाल्याचे लक्षात आल्यावर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले गेले. परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे अटक आरोपीला योग्य ती खबरदारी घेत ताब्यात न ठेवल्याने बेजबाबदारपणा आणि बेपर्वाईचे वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलीस दलाची प्रतिमा या प्रकाराने मलीन झाली असून त्यामुळे महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या