Trending News : महिला डॉक्टरने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने महिला डॉक्टरने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारमधील सारणमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे. 1 जुलै रोजी ही घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयातील खासगी महिला डॉक्टरने प्रियकराचं गुप्तांग कापलं आणि बाथरुममध्ये फेकलं.
महिला डॉक्टरने प्रियकराचं गुप्तांग कापलं
मिळालेल्या माहितीनुसार, मधौरा येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर महिलेने तिचा प्रियकराचं गुप्तांग कापलं. या प्रकरणाची माहिती मिळताच मधुरा पोलिसांनी जखमी प्रियकराला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी तरुणाला छपरा सदर रुग्णालयात पाठवलं, तेथून डॉक्टरांनी त्याला गंभीर अवस्थेत पीएमसीएचमध्ये रेफर केले. दरम्यान, हा जखमी प्रियकर नगरसेवक वेद प्रकाश असल्याचं समोर आलं आहे.
लग्नाला नकार दिल्याने टोकाचं पाऊल, VIDEO समोर
1 जुलैला या दोघांचं लग्न होणार होतं, पण प्रियकर लग्नासाठी पोहोचला नाही. यावरुनच दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला सांगत आहे की, "लग्नासाठी नकार देत होता. मी सांगितलं होतं, लग्न नाही केलंस, तर वाईट होईल. मी गुप्तांग कापलं. आज लग्न होतं, मी याच्या नावाची मेहंदी पण काढली होती. रजिस्टर ऑफिसशी बोलणं पण झालं होतं. पण, हा लग्नस्थळी पोहोचला नाही."
पाहा व्हिडीओ :
महिला डॉक्टरने काय म्हटलं?
महिला डॉक्टरने इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण विचारताच तिने पोलिसांना सांगितलं की, त्या दोघांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरु होते आणि तिचे वेदप्रकाशसोबत शारीरिक संबंध होते, मात्र तो लग्नाच्या नावाखाली तिला फसवत होता. गेल्या काही महिन्यांपासून ते रजिस्टर मॅरेज करणार होते, मात्र तो लग्नाची तारीख आल्यावर पळून जायचा. आज (1 जुलै) पण आमच्या लग्नाची तारीख होती. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लग्नावरुन वाद झाला, म्हणून मी चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून बाथरूममध्ये टाकला', असं महिला डॉक्टरने सांगितलं. 26 वर्षीय महिला डॉक्टर आणि 30 वर्षीय प्रियकर मागील दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते.
घटनेनंतर महिला डॉक्टरची प्रतिक्रिया
बेशुद्ध करुन प्रियकराचं गुप्तांग कापलं
महिला स्वतः नर्सिंग होम चालवते. महिला डॉक्टरने प्रियकराला बेशुद्ध करून बेशुद्धावस्थेत असतानाच त्याचं गुप्तांग कापलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ तेथे पोहोचले. घटनास्थळावरून तेथे असलेला चाकू जप्त करण्यात आला असून त्यासोबत महिलेलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे.
लग्नास नकार दिल्याने टोकाचं पाऊल
सारणचे पोलीस अधीक्षक डॉ. कुमार आशिष यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिला डॉक्टरचे तिच्या प्रियकरासोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. लग्नाबाबत बोलणे झाले होते, मात्र त्याने लग्नास नकार दिल्याचे महिला सांगत आहे.