मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच निर्देशांक सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. हा निर्देशांक पहिल्यांदाच 80 हजारांच्याही पुढे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचाही निर्देशांक निफ्टी हादेखील 24302.15 या ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपसून या निर्देशांकांत वाढ होताना दिसतेय. गुंतवणूकदार शेअर बाजारात मोठा पैसा टाकत आहेत. याच कारणामुळे सरन्यायाधीश धनंजचय चंद्रचूड यांनी भारतीय भांडवली बाजार नियामक सेबी आणि सिक्युरिटिज अपिलेट ट्रिब्यूनलला (SAT) महत्त्वाची सूचना केली आहे. अशा स्थितीत या दोन्ही संस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सरन्यायाधीश म्हणाले आहेत.


सॅट तसेच सेबीवरील जबाबदारी वाढली


सरन्यायाधीश सिक्योरिटीज अपीलेट ट्रिब्यूनलच्या (SAT) मुंबईतील नव्या पिठाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. त्यामुळे या सॅट तसेच सेबीवरील जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे, असेही प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचडून यांनी केले. 


सध्या मुंबई शेअर बाजाराने 80 हजार अंकांच्या पुढे झेप घेतली आहे. सरन्यायाधीशांनी सेबी आणि सॅटला वरील सल्ला देताना वृत्तपत्रांतील याच बातम्यांचा हवाल दिला आहे. सध्याच्या घटना पाहून नियमाक संस्थांनी या काळात प्रत्येकजण धैर्य आणि संतूलन कायम राखून आहे ना, याची खात्री करायला हवी. शेअर बाजारात जेवढी तेजी येईल तेवढीच सेबी आणि सॅट या संस्थांची जबाबदारी वाढेल. या संस्था योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षाही चंद्रचूड यांनी व्यक्त केली. 


'सेबी आणि सॅट यासारख्या नियामक संस्थांवर मोठी जबाबदारी


'सेबी आणि सॅट यासारख्या नियामक संस्थांवर खूप मोठी जबाबदारी आहे.  गुंतवणुकीसाठई स्थिर आणि विश्वसनीय वातावरण तयार करण्यात या संस्थांना राष्ट्रीय महत्त्व आहे. कायद्याच्या मदतीने आमची गुंतवणूक सुरक्षित आहेत, असा विश्वास जेव्हा लोकांना येईल तसेच वादविवादाचे समाधान करण्यासाठी प्रभावी तंत्र उपलब्ध असेल तर भविष्यातही गुंतवणूक वाढेल. गुंतवणुकीच्या बाबतीत असा दृष्टीकोन ठेवल्यास आर्थिक तेजी पाहायला मिळू शकते. यामुळे संपत्ती निर्मिती, रोजगार, तसेच संपूर्ण आर्थिक विकासात वाढ शक्य होईल,' असेही चंद्रचूड म्हणाले. 


आव्हनांना तोंड देण्यासाठी स्वत:ला तयार ठेवावे लागेल


सिक्योरिटिज अपिलेट ट्रिब्यूनल एका पंचाची भूमिका पार पडते. वित्तीय क्षेत्रातील सर्वांनी नियमांचे पालन करावे, यासाठी ही संस्था प्रयत्न करते. आपला बाजार आणि व्यवसाय अधिक किचकट झाले आहेत. नव्या नियमांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या ट्रिब्यूनलला आव्हनांना तोंड देण्यासाठी स्वत:ला तयार ठेवावे लागेल, असा सल्लाही चंद्रचूड यांनी दिला.


हेही वाचा :


Dream Job News : मनासारखी नोकरी हवीय? मग आजपासून 'हे' काम करा, तुमचं स्वप्न होईल पूर्ण 


पगार 55000, शिक्षणाची अट फक्त 10 वी पास, सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी