Chandrapur crime: चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरात मनसे नेत्यावर एका अज्ञात युवकाने दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. अमन अंधेवार या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे.
पाठीत मोठी जखम झाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. शहरातील गजबजलेल्या रघुवंशी व्यापार संकुल परिसरात लिफ्ट जवळ गोळ्या झाडण्यात आल्याने या परिसरात मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट दिली असून हल्ल्या मागचे कारण आणि हल्लेखोर युवकाचा तपास सुरू आहे. पूर्व वैमनस्यातूनही घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा: