एक्स्प्लोर

Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?

Pune Crime Budhwar Peth: पुण्यातील बुधवार पेठेत मंगळवारी मध्यरात्री पोलिसांकडून मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामुळे याठिकाणी ग्राहक म्हणून आलेल्या तरुणांची पंचाईत झाली.

Pune Crime Budhwar Peth: पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला (Pune Police) निलंबित करण्यात आले होते. बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते. (Pune News)

या घटनेनंतर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा घटना थांबल्या पाहिजेत, यासाठी बुधवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे ठरवले. यानुसार, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिट चे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रात्री 12 वाजता मोठा फौजफाटा बुधवार पेठेत (Budhwar Peth) दाखल झाला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. शुक्रवार पेठ पोलिस चौकी जवळ असलेल्या सर्व कुंटणखान्यातील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली. तसेच या ठिकाणी वावरत असलेल्या अनेक तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. अमली पदार्थ तसेच जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली. 

यावेळी कुंटणखान्यातील मुलींची कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान कुंटणखान्यातील 50 घरांची झडती घेण्यात आली. अमली पदार्थांसह, जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात आहे का, याचा शोध या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला. रात्री 12 ते पहाटे  3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. 

Pune news: पुण्याच्या उच्चभ्रू सोसायटीतील हुक्का पार्लरवर छापा

पुण्याच्या धनकवडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत हुक्का पॉट, चिलीम आणि विविध फ्लेवर्स असा 12 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्री गुरुनानक कृपा इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात अवैध हुक्का पार्लरवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

तर दुसरीकडे पुण्याच्या वारजे माळेवाडी परिसरातही पोलिसांकडून एक कारवाई करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी 15 बुलेट सायलेन्सरवर कारवाई केली. वारजे भागातील कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरची पोलिसांनी विल्हेवाट लावली. त्याचबरोबर ज्या गॅरेजवाल्याने असे सायलेनसर बसवले होते त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

मुंबईच्या गोवंडीमध्ये भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर गोळीबार अन् हत्या; प्रेमत्रिकोणाचा संशय, नेमकं प्रकरण काय?

पत्नीच्या कथित प्रियकराला संपवलं, मृतदेह शेजारी बसवून 191 किलोमीटरचा प्रवास, नवी मुंबईतील पोलीस हवालदाराचं भयंकर कृत्य

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget