एक्स्प्लोर

Mumbai Crime News: पत्नीच्या कथित प्रियकराला संपवलं, मृतदेह शेजारी बसवून 191 किलोमीटरचा प्रवास, नवी मुंबईतील पोलीस हवालदाराचं भयंकर कृत्य

Mumbai Crime News: ६ फेब्रुवारी रोजी लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता.

नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. ही हत्या (Mumbai Crime News) कळंबोलीत करून मृतदेह तब्बल १९१ किलोमीटरपर्यंत लांब नेऊन विहिरीत टाकणारा आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील हवालदारच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.(Mumbai Crime News) 

नेमकं काय घडलं?

६ फेब्रुवारी रोजी लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन दिवसांत या प्रकरणाचा तपास केला आहे. या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.(Mumbai Crime News) 

भेटीसाठी बोलावलं अन्...

घटनेचा तपास करत असताना पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पुण्यातील एका संशयित (Mumbai Crime News) कारपर्यंत पोहोचले. बंडू भिसे या रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदारानेच मित्रांच्या मदतीने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली येथे राहत होता. त्याच परिसरातील सोमनाथ बोबडे याच्याशी त्याची मैत्री होती; मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसे याला होता.(Mumbai Crime News) 

विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून ५ फेब्रुवारीला सोमनाथला भेटीसाठी बोलावून त्याचं तोंड दाबून निर्घृण खून केला. सहायक निरीक्षक शिवाजी जायपात्रे, उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या (Mumbai Crime News) पथकाने अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.(Mumbai Crime News) 

अटकेनंतरही कबुलीस नकार

सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर ठेवून स्वतः भिसे याने १९१ किलोमीटरचा प्रवास केला. अटकेनंतरही भिसे गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र, लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.(Mumbai Crime News) 

Crime News: गोवंडीमध्ये 19 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या; प्रेमत्रिकोणाचा संशय

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी दुपारी 19 वर्षीय शिफा शेख हिची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेमत्रिकोणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.शिफा ही कमला रमण नगर येथे कुटुंबासोबत राहत होती. ती नादिम नावाच्या तरुणाशी संबंधात होती, तसेच नादिमचे दुसऱ्या एका तरुणीशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणी 25 वर्षीय महिला आणि 23 वर्षीय पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. शिफा नाश्त्यासाठी घराबाहेर पडली असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर गोळीबार केला. तिच्या मानेवर आणि गालावर गोळ्या लागल्या होत्या. स्थानिकांनी तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Supriya Sule : अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला
अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला
Rajya Sabha Election : शिंदेची शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध!
शिंदेची शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Embed widget