एक्स्प्लोर

पुण्यात ज्योतिषाचं संतापजनक कांड ! तरुणीला whatsapp वर मेसेज करत एकटीला बोलवलं, नंतर पडद्यामागे बोलवत डाव साधला

तरुणीने ज्योतिषाला ढकलून घाबरून कसा बसा कार्यालयातून पळ काढला .त्यानंतर तातडीने आपल्या मोठ्या भावाला फोन करून घडलेल्या प्रकार सांगितला .व स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली .

Pune crime:  पुण्यात वारंवार गुन्हेगारीचा घटना समोर येत असताना आता एक धक्कादायक प्रकार घडलाय. पत्रिका पाहून भविष्य वर्तवण्याचा दावा करणाऱ्या एका कथेत ज्योतिषाला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. भावासाठी एक वस्तू देण्याच्या बहण्याने ज्योतिषानं व्हॉट्सॲपवर मेसेज करून तरुणीला एकटीला बोलवलं .  तरुणीनं विरोध केला पण ज्योतिषानं आपले खरे रंग दाखवलेच . महिलेला कानात मंत्र देण्याच्या बहाण्याने तिला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केला . महिलेनं कशीबशी आपली सुटका करत पळ काढला . 

घटनेची तातडीने माहिती तरुणीने आपल्या भावाला दिली .आणि थेट पोलीस ठाणे गाठलं .ज्योतिषाविरोधात तक्रार दिल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी अखिलेश लक्ष्मण राजगुरू (45) असे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषाचे नाव आहे .या ज्योतिषाच्या विरोधात यापूर्वी अशा अनेक प्रकारचा तक्रारी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .

नेमके प्रकरण काय ?

देवाधर्माच्या नावावर पैसे उकळणाऱ्या गुरुजींची राज्यात कमी नाही . कुडमुड्या ज्योतिषांच्या अनेक घटना कानावर पडत असतानाच पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय . मोठ्या भावाची पत्रिका घेऊन 12 जुलै 2025 रोजी लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणी संबंधित ज्योतिषाच्या कार्यालयात गेली होती . पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची आहे त्यासाठी शनिवारी या असं सांगितलं . नंतर काही वेळाने ज्योतिषाने तरुणीला व्हाट्सअप वर मेसेज केला .तुमची वस्तू आली आहे ती घेण्यासाठी एकटीच ये . यावर तरुणीने मी नंतर वस्तू घेण्यासाठी येते असा मेसेज पाठवला .

18 जुलै रोजी ज्योतिषाने पुन्हा व्हाट्सअप वर मेसेज करून उद्या सकाळी दहा वाजता तुमची वस्तू घ्यायला या असे सांगितल्यानंतर तरुणी 19 जुलै रोजी कॉलेज वरून थेट ज्योतिषाच्या कार्यालयात पोहोचली .त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते .तुमच्या डोक्यावर वस्तू ठेवून काही मंत्र बोलावे लागतील असं सांगून ज्योतिषाने तरुणीला पडद्याच्या मागे बोलावले . ज्योतिषाच्या संशयास्पद हालचालींमुळे तरुणी सावध झाली होती .मला वस्तू नको मी नंतर येते असं सांगून ते उठली .कार्यालयातून बाहेर पडत असतानाच ज्योतिषाने डाव साधला . तरुणीला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केला .तरुणीने ज्योतिषाला ढकलून घाबरून कसा बसा कार्यालयातून पळ काढला .त्यानंतर तातडीने आपल्या मोठ्या भावाला फोन करून घडलेल्या प्रकार सांगितला .व स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली .

तरुणीने सहकार नगर पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली .त्यानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी ज्योतिषाच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली .या ज्योतिषाने यापूर्वीही अशा अनेक प्रकारचे चाळे महिलांबरोबर केले असण्याची शक्यता पोलिसांना वाटतेय .याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे .

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget