एक्स्प्लोर

पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त

आंदेकर टोळी तुरुंगातूनही सक्रीय असल्याचे समोर आल्यानंतर पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्याच्या कारागृह प्रशासनाला एक पत्र लिहिले आहे.

अहिल्यानगर : महापालिका निवडणुकांपूर्वी पुण्यात (Pune) आंदेकर टोळीत झालेल्या मारहाणीच्या घटनांमध्ये हत्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे, आंदेकर (Andekar) टोळीतील प्रमुख सध्या तुरुंगात असले तरी त्यांची टोळी जिल्ह्यात आणि शेजारील जिल्ह्यात सक्रीय असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे कारागृहाच्या भिंतींआड बसूनही आंदेकर टोळी पुणे शहरात सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. टोळीच्या म्होरक्यांकडून पूर्ववैमनस्यातून शहरात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर घटना पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्यातच, आता अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) आंदेकर टोळीच्या 5 जणांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून शस्त्रसाठी जप्त केला आहे. 

आंदेकर टोळी तुरुंगातूनही सक्रीय असल्याचे समोर आल्यानंतर पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्याच्या कारागृह प्रशासनाला एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आंदेकर पिता-पुत्रासह टोळीतील प्रमुख गुन्हेगारांवर कारागृहातच कडक निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कुविख्यात आंदेकर टोळीतील 5 जणांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील मिरावली पहाडच्या पायथ्याशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. दरोड्याच्या तयारीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्याने दरोड्याचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींत मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर, समर्थ दूधभाते, आणि आकाश पवार या आरोपींचा समावेश आहे....

10 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त

पोलिसांनी आरोपीकडून 4 पिस्टल, 10 जिवंत काडतूसे, 1 कोयता,1 चाकूसह एकूण 2 लाख 76 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते या दोघांवर पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, मकोका, शस्त्र बागळने यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत.

सूर्यकांत बंडू आंदेकर धुळे कारागृहात

सध्या आंदेकर टोळीचा मुख्य आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा धुळे येथील जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा नंदुरबार येथील कारागृहात आहे. या दोघांवरही खंडणी गोळा करणे (Extortion) आणि खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' म्हणजेच 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कारागृहातून सुरू असलेली ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

हेही वाचा

जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget