एक्स्प्लोर

Priya Singh Case : प्रिया सिंह मारहाण प्रकरण; आरोपी अश्वजीत गायकवाडला काल अटक आणि आज जामीन

Priya Singh : प्रिया सिंह मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी आरोपी अश्वजीत गायकवाड याला रविवारी, 17 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले.

Priya Singh Case : सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर प्रिया सिंह (Priya Singh) जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी अश्वजीत गायकवाड (Ashwajit Gaikwad) याला ठाणे कोर्टाने जामीन दिला आहे. त्याशिवाय, इतर दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रिया सिंह मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी आरोपी अश्वजीत गायकवाड याला रविवारी, 17 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली होती. सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. राज्य महिला आयोगानेदेखील पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी कारवाई केली. ठाणे पोलिसांनी अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या आरोपींना रविवारी रात्री 8.53 वाजण्याच्या सुमारास अटक केली होती. 

आरोपींना कोर्टाकडून जामीन मंजूर

प्रिया सिंग मारहाण प्रकरणात अश्वजीत गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. आरोपींना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. पोलीस तपास कामात सहकार्य करणे, फिर्यादी आणि साक्षीदार याच्यावर कोणताही दबाव टाकू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. 

अश्वजीत घटनास्थळी नव्हता; वकिलांचा दावा

आरोपी अश्वजीत गायकवाडचे वकील अॅड. राजन साळुंखे यांनी सांगितले की, या प्रकरणात अश्वजीत स्वतःपोलीस ठाण्यात हजर झाला होता. आज त्याला न्यायालयात हजर केला असता पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र गुन्ह्याचं स्वरूप बघता जामीन पात्र गुन्हे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला. त्यानंतर आम्ही जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्या सुनावणीत न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर केला असल्याची माहिती अॅड. सिंह यांनी दिली.  ज्यावेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला अश्वजीत त्या गाडीत हजर नव्हता. त्यामुळे जे घडलं तो फक्त एक अपघात होता असेही त्यांनी म्हटले. 

राजकीय आरोप-प्रत्यारोप 

प्रिया सिंह प्रकरणांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. आरोपीचे वडील उच्च पदस्थ आहेत. त्याशिवाय राजकीय वरदहस्तामुळे आरोपीला अटक होत नसल्याची टीका करण्यात येत होती. रविवारी आरोपींना अटक केल्यावर आज विरोधकांनी आरोपींवर जामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावली असल्याचा आरोप केला होता. 

काय आहे प्रकरण? 

अश्वजीत आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं. प्रिया तिथे गेल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात अश्वजीतनं त्याचा ड्रायव्हर सागरला प्रियावर गाडी घालायला सांगितलं. सागरनंही त्याचं ऐकलं आणि भलीमोठी रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी त्यानं तिच्या अंगावर घातली. 

त्यानंतर प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले. अर्ध्या तासानं रस्त्यावरून जाणाऱ्या एकानं तिला पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं. त्यानंतर प्रियाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अश्वजीतचे काही मित्र रुग्णालयात जाऊन प्रियाला धमक्या देत असल्याचं समोर आलं. प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला वाचा फोडली. 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget