हिंगोली : सरकारी विभागात पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. त्यामुळे, चीरिमिरी देऊनच आपलं काम लवकर होईल, म्हणून अनेकदा संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला लाच देऊन काम सोपं केलं जात. याबाबत सरकारकडून सातत्याने जनजागृतीही करण्यात येते. कुठेही सरकारी खात्यात पैसे देऊ नका, लाच (Bribe) देऊ नका, कोणी लाच मागितील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा, असे आवाहनही केले जाते. मात्र, या भानगडीत पडण्यापेक्षा पैसे देऊन काम करुन घ्या, अशीच अनेकांची मानसिकता असते. पण, काही जागरुक आणि सज्ञान नागरिक लाच देण्यास विरोध करतात, प्रसंगी संबंधितांची तक्रारही करतात. त्यात तक्रारीतून आता (Hingoli) हिंगोलीतील एका पोलीस (Police) कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 


डिजिटल इंडियामुळे भारतातील व्यवहारही डिजिटल झाले आहेत. फोन पे, गुगल पे, भीम अॅपसह इतरही ऑनलाईन पेमेंट सुविधांद्वारे कॅशलेस व्यवहार केले जातात. भाजी मंडईतील दुकानात, पाणीपुरी गाड्यावरही डिजिटल पेमेंट सुविधा सर्रास पाहायला मिळत आहेत. तर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यामध्ये भिकारीही भीक मागताना डिजिटल पेमेंटद्वारे मागणी करतात, तसेच जुगार खेळणारे, ऑनलाईन गेमिंग खेळणारेही स्कॅन करुन पैशांची देवाण-घेवाण करत असतात. मात्र, आता सरकारी विभागातही डिजिटल स्वरुपात लाच घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
  
हिंगोली पोलिसांच्या सायबर पथकातील पोलीस कर्मचारी दीपक पाटील याने फिर्यादी विनायक बेंगाळ यांना सापडलेला मोबाईल घेऊन कार्यालयात बोलवले होते. कार्यालयात आल्यावर बेंगाळ यांना सापडलेला मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर चर्चेअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरलं. त्यानुसार, विनायक बेंगाळ यांनी पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांना पाच हजार रुपये फोन पे द्वारे लाच पाठवली होती. दरम्यान, या घटनेची तक्रार लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. फिर्यादी विनायक याच्या तक्ररीवरुन पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हेही वाचा


Madha Lok Sabha: मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न अन् व्हिडिओ व्हायरल करणे भोवलं; पोलिसांनी केला गुन्हा दाखल