Oil comapny Job cut News : सरकारी तेल आणि वायू कंपन्यांमधील (oil and gas companies) कर्मचाऱ्यांची संख्या (Number of employees) मोठ्या प्रमाणात घटली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्यामुळं नफ्यात (Profit) मोठी वाढ झालीय. सहा वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांची संख्या ही 1,10,000 होती. ही कर्मचाऱ्यांची संख्या सध्या 94,300 इतकी कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात उत्पादन, विपणन आणि संशोधन आणि विकास क्षेत्रातील नोकऱ्या 20 -24 टक्क्यानी कमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्यानंतर तेल कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ झालीय. सहा वर्षात कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये 14 टक्क्यांची म्हणजेच 15,700 इतकी घट झालीय. तेल कंपन्या सध्या मोठ्या नफ्यात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोणत्या विभागात किती नोकऱ्या कमी झाल्या?
एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांची घट झालीय. तर पर्यवेक्षक, लिपिक आणि कामगारांसह गैर व्यवस्थापकीय नोकऱ्यांमध्ये 25 टक्क्यांची घट झालीय. सशोधन क्षेत्रातील नोकऱ्या 16 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तसेच उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पाच टक्क्यांची घट झालीय. मागील सहा वर्षात तेल कंपन्यांनी रोजगारासाठी 680000 कोटी रुपये खर्च केले आहेत.
तेल कंपन्यांना कौशल्य असलेल्या लोकांची गरज
तेल कंपन्यांना कौशल्य असलेल्या लोकांची गरज आहे. त्यामुळेच जे लोक कामाचे आहेत, त्यांनांच कंपनी कामावर ठेवते, अन्यथा लोकांना कामावरुन कमी केलं जात आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये 28,000 कर्मचारी होते, ONGC मध्ये 24,000 कर्मचारी होते. एकूण नोकऱ्यांमध्ये अधिकारी किंवा व्यवस्थापकांचा वाटा इंडियन ऑइलमध्ये 58 टक्के आणि ओएनजीसीमध्ये 60 टक्के होता. म्हणजे व्यवस्थापकांचा वाटा जास्त आहे.
चालू आर्थिक वर्षात तेल कंपन्यांचा नफा 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार
मिळालेल्या माहितीनुसार तेल कंपन्या सध्या मोठ्या नफ्यात आहेत. देशातील तीन तेल कंपन्याला 82 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा झाला आहे. तर चौथ्या तिमाहीत तिन्ही कंपन्यांचा नफा 50 टक्क्यांनी घटला आहे. त्या आधीच्या तिमाहीत तिन्ही कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण हे 69 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात तेल कंपन्यांचा नफा 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
जागतिक स्तरावर यावर्षी मंदीचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्यावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
तेलाच्या मागणीत वाढ, 2030 पर्यंत तेलाच्या वाढत्या मागणीमध्ये भारताचा सर्वात मोठा वाटा राहणार