मुंबई : महाराष्ट्र सरकारनं फेब्रुवारी महिन्यात राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणारा कायदा मंजूर केला होता. राज्य सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास  प्रवर्गाची (SEBC) निर्मिती करुन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं होतं. राज्य सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पदभरतीच्या जाहिरातीबाबत शुद्धिपत्रक जारी केलं आहे. या शुद्धिपत्रकाद्वारे एसईबीसी प्रवर्गाच्या जागांचा समावेश करण्यात आला आहे. जाहिरातीद्वारे 250 जागांची वाढ देखील करण्यात आली आहे.   


महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ची जाहिरात 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ती जाहिरात 274 रिक्त पदासांठी जाहीर करण्यात आली होती. मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलं होतं. त्या एसईबीसी प्रवर्गाचा समावेश करुन एकूण पदांमध्ये 250 जागांची वाढ करण्यात आली आहे. आता एकूण 524 पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येईल. 


6 जुलै रोजी परीक्षा


डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी होणार होती. आता एमपीएससीच्या नव्या शुद्धिपत्रकानुसार सदर परीक्षा 6 जुलै 2024 रोजी होणार आहे.  


महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 ही राज्य सेवा परीक्षेअंतर्गत 431 जागांसाठी ही प्रक्रिया होईल.


उपजिल्हाधिकारी 7 पदे,


सहायय्क राज्य कर आयुक्त, गट- अ 116 पदे,


गटविकास अधिकारी गट-अ 52 पदे,  


सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ 43 पदे,


सहायक आयुक्त प्रकल्प अधिकारी 3 पदे,


उद्योग उप संचालक(तांत्रिक) गट-अ 7 पदे,


सहायक कामगार आयुक्त गट -अ 2 पदे,


सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता गट अ 1 जागा,


मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब 19 पदे,


सहायक गटविकास अधिकारी, गट ब 25 पदे,


सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क 1  पद,


उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 5 पदे,


कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता- मार्गदर्शन अधिकारी 7 पदे,


सरकारी कामगार अधिकारी 4 पदे,


सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारीय गृहप्रमुख / प्रबंधक 4 पदे,


उद्योग अधिकरी तांत्रिक 4 पदे,  


सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण, आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब 52 पदे,


निरीक्षण अधिकारी (पुरवठा) गट-ब 76 पदे


महाराष्ट्र वनसेवा परीक्षेअंतर्गत 48 पदांची भरती होणार आहे. सहायक वनसंरक्षक गट अ 32 पदे, वनक्षेत्रपाल गट-ब  16 पदांसाठी भरती होणार आहे. 


दरम्यान, आयोगानं या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मे पर्यंत मुदत दिली आहे.


संबंधित बातम्या :


BSF Vacancy : सीमा सुरक्षा दलात अधिकारी होण्याची संधी, 2 लाख रुपये पगार; अर्ज कसा करायचा?


पोस्ट पेमेंट बँक ते मुंबई नेव्हल डॉकयार्ड, वेगवेगळ्या विभागात नोकरीची नामी संधी, जाणून घ्या अर्ज कसा करावा? परीक्षा कधी होणार?