पिंपरी चिंचवडमध्ये सिमेंटच्या गट्टूने ठेचून एकाची हत्या; ऐन गणपतीत फूटपाथवर मृतदेह आढळल्याने खळबळ
Pimpri Chinchwad Crime : अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, ती ओळख पटली की हत्या करणारा कोण हे उघड होणार आहे. वाकड पोलीस त्याच दिशेने सध्या तपास करतायेत.
पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) ऐन गणेशोत्सवात एकाची हत्या झाल्याचं उघडकीस आलंय. काळेवाडीतील (Kalewadi Crime) फुटपाथवर दगडाने ठेचून हत्या केली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडल्याचा पोलिसांचा (Police) प्राथमिक अंदाज आहे मृतदेहाच्या शेजारी रक्ताने मखलेला सिमेंटचा गठ्ठू सापडल्याने दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी वाकड पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवााडील फुटपाथवर दोन बेंचच्यामध्ये हा मृतदेह सोमवारी सकाळी आढळलाय. मृतदेहाच्या शेजारीच रक्ताने माखलेला सिमेंटचा गठठू असल्यानं ही हत्याचं असेल असा पोलिसांचा अंदज आहे. पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरु केला आहे. मध्यरात्री तीनच्या नंतर ही घटना घडल्याचा वाकड पोलिसांचा अंदाज आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, ती ओळख पटली की हत्या करणारा कोण हे उघड होणार आहे. वाकड पोलीस त्याच दिशेने सध्या तपास करतायेत.
पुण्यातील एन्जॉय ग्रुपच्या मुस्क्या आवळल्या
पोलिसांनी पुण्यातील एन्जॉय ग्रुपच्या मुस्क्या आवळल्या आहेत. एन्जॉय ग्रुपकडून 7 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त करण्यात आले आहे. शुभम जगतापसह सात जणांना लोणीकंद पोलिसांनी हिसका दिला आहे. एन्जॉय ग्रुपच्या गुन्हेगार सदस्याकडून 7 पिस्तुले सह 23 काडतुसे असे जप्त करण्यात आहेत. एन्जॉय ग्रुपचा शुभम मॅटर जगतापसह सात जणांच्या मुस्क्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या आहेत. सुमित उत्तरेश्वर जाधव, अमित मस्के आवाचरे, ओमकार उर्फ भैया जाधव, अजय उर्फ सागर हेगडे, राज बसवराज स्वामी, लतीकेश गौतम पोळ, रोप उर्फ लाला बागवान, या गुन्हेगारांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या.
लोणीकंद पोलिसांचा तपास सुरू
आरोपींनी कोलवडीतील प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा अतिशय वेगाने तपास करत लोणीकंद पोलिसांनी एन्जॉय ग्रुपला हिसका दाखवला एन्जॉय ग्रुपच्या गुन्हेगारावर कारवाई झाल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली आहे. अधिक तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.
हे ही वाचा :
विकृतीचा कळस! एक महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले, अज्ञात पालक पसार, मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमध्ये संतापजनक प्रकार