Parbhani Crime: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. परभणीत पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या शेजारीच तरुणाकडून मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. छेड काढणाऱ्याला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
राज्यात बदलापूर,नाशिक, कोल्हापूर, चंद्रपुर, पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमधून महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान, नागरिक सजग झाल्याचं दिसून येतंय.
नक्की झालं काय?
परभणीच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरच एका तरुणाने युवतीला छेडले. रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, तरुणी जोरात ओरडल्याने आसपासची लोकं जमा झाली. मुलीने ओरडल्याने हा तरुण पळून जात होता. मात्र,जमा झालेल्या स्थानिकांनी त्याला शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलवत त्यांच्याकडे या तरुणाला स्वाधिन केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून शहरातील छेडछाडीचे प्रकार वाढल्याने नागरिक संतापले आहेत.
तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या
गावातीलच एका तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावात घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय.
बदनामीच्या भीतीने संपवली जीवनयात्रा
कुटुंबाच्या तंबीनंतर देखील 16 जुलैपासून पुन्हा तो तरुणीला त्रास देऊ लागला. यामुळे तरुणी प्रचंड दडपणाखाली होती. त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी तरुणीने साहिल पुन्हा त्रास देऊ लागल्याने आणि तो असह्य झाल्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. बदनामीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी साहिल बबन डफेदार याने मानसिक त्रास देऊन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिलीय.
नाशिकमध्ये संतापजनक प्रकार
बदलापूरच्या घटनेच्या (Badlapur School Case) निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये (Nashik Crime News) 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या उपेंद्रनगर (Upendranagar) परिसरात ही घटना घडली आहे.
हेही वाचा:
गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा, मिरज तालुक्यातील घटना
रक्ताचे डाग, चप्पल अन् काडतुसे, रायगडमध्ये संशयित कार आढळल्याने खळबळ!