Shikhar Dhawan Retirement : गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटून मोठा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय धवनने आपल्या समाजमाध्यम खात्यांवरून जाहीर केला आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.  


व्हिडीओ पोस्ट करत निवृत्ती जाहीर (Shikhar Dhawan Retirement Video)


शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. 


पाहा व्हिडीओ :






शिखर धवनचं क्रिकेट करिअर (Shikhar Dhawan Cricketer Career)


शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. विशेष म्हणजे एकदा मैदानावर उतरल्यानंतर तो आक्रमकपणे खेळून समोरच्या गोलंदाजाला घाम फोडायचा. त्याची आक्रमक फलंदाजी पाहूनच भारतीय संघात तो फलंदाजीसाठी सलामीला यायचा. त्याने आतापर्यंत 34 कसोटी,  167 एकदिवसीय तसेच 68 सामने खेळलेले आहेत. 38 वर्षीय शिखर धवन साधारण 2022 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता.   


2010 साली भारतीय संघासाठी पहिल्यांदा खेळला


देशांतर्ग क्रिकेटमध्ये कित्येक वर्षे खेळल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने भारतीय संघाकडून 2010 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात फलंदाजी केली. मात्र या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. नंतर मात्र त्याने स्वत:ला सिद्ध केलं आणि भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या पंक्तीत तो जाऊन बसला. 


शिखर धवनचं आयपीएल करिअर


शिखर धवनने इंडियन प्रिमियर लिगमध्येही धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. तो पंजाब किंग्ज या संघाचा कर्णधार राहिलेला आहे. आयपीएलमध्ये तो एकूण 222 सामने खेळला. त्याने आयपीएलमध्ये एकूण 6769 सामने खेळले.  आयपीएलमध्ये त्याने एकूण 51 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावलेली आहेत. एप्रिल 2024 मध्ये त्याला पंजाब किंग्ज या संघाने 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.


हेही वाचा :


हार्नियाशी झुंज सुरु असतानाच नीरज चोप्राने 89.49 मीटर दूर भाला फेकला, डायमंड लीगमध्ये दुसरं स्थान पटकावलं


Shakib Al Hasan : मोठी बातमी : बांगलादेशचा क्रिकेटर शाकिब अल हसनवर हत्येत सहभागी असल्याचा आरोप


Video: रोहित शर्मा दुसऱ्यांदा 'बाबा' होणार?; पत्नी रितिकाच्या व्हिडीओने चर्चांना उधाण