रायगड : जिल्ह्यातील खोपोली परिसरात एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगत एक संशयित कार सापडली आहे. या कारमध्ये रक्ताचे डाक आढळले असून त्यात आणि दोन काडतुसेही सापडली आहेत. 22 ऑगस्टच्या रात्री हा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती होताच पोलिसांनी धाव घेत डॉग स्कॉडच्या मदतीने कार तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. पोलीस कारमध्ये रक्ताचे डाक कसे आले? तसेच कारमध्ये बंदुकीच्या गोळीची दोन काडतुसे कशी आली? याचा तपास करत आहेत? 
  


नेमकं काय समोर आलं?


खोपोली हद्दीतील मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या जवळ फूड मॉलला जाणाऱ्या बाह्य रोडवर एका कारमध्ये काही रक्ताचे डाग व बंदुकीची काडतुसे असलेली कार सापडली.या कारमध्ये मात्र कोणीही आढलले नाही. पोलिसांना या कारमध्ये काही कागदपत्रे आढळली आहेत.या कागदपत्रांनुसार हीकार नवी मुंबईमधील नेरुळ येथिल असल्याचे निष्पन्न झाले आहे. 


एका युवकाचे नाव सुमित जैन


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये दोन युवक होते.यातील एका युवकाचे नाव सुमित जैन  होते. अन्य एका व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. सध्या आढललेली कार ही मारुती कंपनीची बलेनो कार आहे. 


रक्ताचे डाक, काचेवर बंदुकीची फायरिंग


खोपोली परिसरात आढळलेली ही कार विचित्र स्थितीत आढळली आहे. या कारमध्ये रक्ताचे डाग आहेत. सोबतच कारच्या पाठीमागील काचेवर बंदुकीने कोणीतरी गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. सोबतच कारमध्ये दोन काडतुसेही सापडली आहेत. कारच्या अशा स्थितीमुळे या ठिकाणी नेमका काय प्रकार घडला असावा? याचा पोलीस शोध घेत आहेत. 


फोन बंद, कारमध्ये आढळल्या चपला


दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणातील दोन्ही युवकांचे फोन सध्या बंद येत आहेत. कारमध्ये दोन्ही युवकांच्या चपला व अन्य साहित्य आढळले आहे.


हेही वाचा :


Kolhapur : कोल्हापुरातील शियेमध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन खून, नातेवाईकानेच केलं कृत्य, पोलीस तपासात उघड


Baramati Crime News: स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आरोपीचा गेम; अल्पवयीन असताना केला होता खून आता दोन वर्षांनी झाली हत्या


"माझी अडीच एकर जमीन कुठंय?", जाब विचारत चुलत भावावर कोयत्याने वार; पोलीस पाटलासमोर केला खून!