एक्स्प्लोर

दुचाकीसाठी पूजाकडे माहेरून 50  हजाराचा तगादा , नवरा - नणंदेच्या  त्रासाला कंटाळून गळफास; महिनाभरानंतरही न्याय मिळेना

Parbhani women sucide:आज या घटनेला 1 महिना उलटतोय. मात्र ,अद्यापही तिच्या नवऱ्याला आणि इतरांना अटक करण्यात आलेली नाही.

Parbhani crime:  हुंडा देवून,थाटामाटात लग्न लावून दिल्यानंतरही  सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणारी पैश्यांची मागणी आणि त्यातून केला जाणारा छळ असह्य झाल्याने वैष्णवीने आत्महत्या केली . त्यानंतर वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाला अटक झाली. मात्र, या वैष्णवी सारखाच परभणीतील पूजाला  न्याय मिळेल का ? असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडलाय . कारण दुचाकी घेण्यासाठी 50 हजार पूजाच्या कुटुंबियांनी दिले नाहीत, त्यामुळे पूजाचा छळ करण्यात आला आणि त्यातूनच तिनेही आत्महत्या केली. आज या घटनेला 1 महिना उलटतोय. मात्र ,अद्यापही तिच्या नवऱ्याला आणि इतरांना अटक करण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे पूजाच्या आई वडिलांना पोलिसांनी कित्येक तास बसून घेतले, त्यानंतर गुन्हा दाखल केला.

नक्की प्रकरण काय?

परभणीच्या तुळजापूर गावामध्ये राहणारे आणि पेशाने ड्रायव्हर असलेले गणेश बोचरे यांना चार मुली आणि एक मुलगा यातील दोन नंबरची मुलगी पूजा हीचा विवाह परभणीच्या सेलू तालुक्यातील सेलवाडी येथील गजानन निर्वळ या तरुणाशी ३ डिसेंबर २०२४ ला झाला होता .  गणेश विचारे ड्रायव्हर असल्याने त्यांनी परिस्थिती जेमतेमच ; मात्र तरीही कर्ज काढून मुलीचे लग्न निर्वळ कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मोठ्या थाटात केले . अनेक वस्तूही मुलीच्या सुखी संसारासाठी दिल्या .होत्या .  निर्वळ हा पुण्यातील चाकण येथे खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याने लग्न झाल्यावर पूजाही पुण्यात गेली . तिथं गजाननचे आई वडील नणंद तिची 2 मुले ही एकत्रच स्पाईन सिटी खराबवाडी महाळुंगे येथे राहत होते.

लग्नानंतर  3 महिन्यात पैशांसाठी तगादा

लग्न झाल्यानंतर तीन महिने चांगलं नांदवलं . मात्र , तीन महिन्यानंतर पूजाचा पती गजानन याने 'मला दुचाकी घ्यायची आहे , त्यामुळे तुझ्या आई-वडिलांकडून 50,000 रुपये घेऊन ये .. 'असा तगादा लावला . पूजानेही तिच्या आई-वडिलांना या संदर्भात सांगितले व 50,000 रुपये देण्याची मागणी केली .मात्र, लग्नाच्या अगोदरच झालेले कर्ज असल्याने पन्नास हजार रुपये आपण देऊ शकत नसल्याचा तिच्या आई-वडिलांनी सांगितलं .  यावरूनच पूजा चा नवरा गजानन व तिच्या नणंदेकडून  पूजाचा छळ सुरू झाला .

पूजाच्या कुटुंबियांनी नोंदवली  तक्रार

27 एप्रिल रोजी दुपारी पूजाच्या सासऱ्याने यांना फोन करून सांगितले की पूजाने आत्महत्या केली आहे . मग पूजाचे वडील गणेश तसेच आई रेखा मुली व गावातील काहीजण घेऊन हे सर्व कुटुंब पुण्यात पोहचलं .  त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं हे विचारलं  असता गजानन यांनी काहीही त्यांना सांगितले नाही . यानंतर पूजाचा अंत्यविधी उरकला. एक मे रोजी पूजाच्या आई-वडिलांनी पुण्यातील महाळुंगे पोलीस स्टेशन गाठले आणि पूजाचा 50 हजारांसाठी तिच्या नवऱ्याकडून आणि ननदेकडून छळ करण्यात आला आणि त्यांनीच माझ्या पूजाचा खून केला, अशी तक्रार पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेले. मात्र अनेक तास त्यांना बसून ठेवण्यात आलं.  त्यानंतर टाळाटाळ केल्यानंतरही पूजाच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्याचा तगादा लावला. त्यामुळे पोलिसांनी अनेक तास उशिराने पूजाचा नवरा आणि तिच्या नणंदे विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही या प्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारची अटक किंवा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय सरकारने द्यावा अशी मागणी पूजाच्या आईने केली आहे .

 

महत्त्वाच्या बातम्या

कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget