Palghar Crime : पालघरच्या (Palghar Crime) वाडा येथे घरी सोडण्याच्या आमिषाने एका नराधमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत दिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास पवार याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


अधिकची माहिती अशी की, संध्याकाळच्या सुमारास बसची वाट बघणाऱ्या या तरुणीला मोटरसायकल वरून घरी सोडतो असं सांगून या आरोपीने तिच्यावर रस्त्यात लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.  या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वाडा पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीने पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती . या प्रकरणात अटक आरोपीला उद्या न्यायालयात हजर केल् जाणार असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी दिली आहे.


दत्तात्रय किंद्रे म्हणाले, वाडा पोलीस स्टेशनमध्ये गंभीर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. काल रात्र महाविद्यालयीन मुलीला मोटारसायकलवरुन वडिलांसोबत सोडवण्याच्या बहाणा करण्यात आला. त्यानंतर गावाच्या जवळ आल्यानंतर वडिलांना शॉर्टकटने जायचं आहे, असा बहाणा करुन त्यांनाही बाजूला सोडून आरोपीने पीडित मुलीला जंगलात नेऊन मारहाण करत अत्याचार केले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलांवर डान्स टीचरकडून लैंगिक अत्याचार 


पुण्यातील एका नामांकित शाळेत चौथ्या वर्गाची होणाऱ्या आणि सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलावर डान्स टीचरने अश्लील चाळे केले. त्यानंतर या डान्स टीचरला अटक करण्यात आली. त्यासोबत शाळेच्या संस्थाचालक अन्वित फाटक यांना देखील अटक करण्यात आली. या प्रकरणात दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात एका पालकाने संस्थाचालक असलेल्या अन्वित फाटक यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी फाटक यांना अटक केली. दोन विद्यार्थ्यांसोबत ही घटना घडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा दोन पालकांनी आपल्या मुलासोबत असाच घडल्याची तक्रार पोलिसांना दिली आहे.  या प्रकरणात अजून काही तक्रारी येण्याची शक्यता असल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाला...


संतोष देशमुख हत्या प्रकरण! आरोपीचं एन्काऊंटर करणाऱ्याला 51 लाख रुपये आणि 5 एकर  जमिन बक्षीस, माढ्यातील शेतकऱ्याची घोषणा