Solapur Agricultural Produce Market Committee onion :  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस देखील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. आज माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यानं उद्या लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही. दरम्यान, माथाडी कामगारांच्या या निर्णयामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 


आज कांद्याचे लिलाव झाले पण माथाडी कामगारांनी माल उचलला नाही


केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं कालपासून माथाडी कामगार वेगळेवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. आज कांद्याचे लिलाव पार पडले असले तरी माथाडी कामगारांनी माल उचलला नव्हता. त्यामुळं उद्या देखील कांदा बाजारात येणार नसल्याने आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग दोन कांद्याचा लिलाव होणार नाहीत. 


पोलिसांनी माथाडी कामागराला अरेरावी करत गच्ची पकडल्याचा आरोप


आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले आहेत. मात्र, यानंतर माथाडी कामगारांनी पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. आज माथाडी कामगार माल उचलणार नाहीत. आज सकाळी कांद्याचे वजन होऊन लिलाव देखील पार पडले. मात्र कांदा गाड्यात भरणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. त्यामुळं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. आज सकाळी कांद्याचे वजन होऊन लिलाव देखील पार पडले आहेत. मात्र, कांदा गाड्यात भरणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. पोलिसांनी एका माथाडी कामागराशी अरेरावी करत गच्ची पकडल्याचा आरोप माथाडी कामागरांनी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून संतप्त माथाडी कामागरांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आज माल लोडींग करणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. माथाडी कामगार, बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न आज करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील तोडगा निघालेला नाही. त्यांमुळं उद्या ाणि परवा लिलाव बंदच राहणार आहेत. 


नेमकं काय म्हणाले होते अमित शाह?


आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारख म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाहांनी म्हटलं आहे. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे शंभर वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले.