Akhilesh Shukla, Kalyan Crime : "तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता असं म्हणत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी लोकांना मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन झालाय. कल्याण मराठी कुटुंब मारहाण केल्या प्रकरणी फरार असलेला आरोपी अकीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आलाय. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती दिली आहे. 



कल्याणमधील मारहाण प्रकरणावर अखिलेश शुक्लाचे स्पष्टीकरण 


अजमेरा इमारतीतील वादानंतर अखिलेश शुक्ला याने पोलिसांना स्वाधीन होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ शूट करत स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या जुन्या शेजारच्या वादाला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला. शुक्ला यांचा आरोप : माझ्या पत्नीवर आधी हल्ला झाला त्यानंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवले. आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहते आणि मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेत भांडण केले.माझ्या पत्नीला केसांनी पकडून आधी मारहाण केली गेली.


कल्याण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, bns 109 गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, त्याचा तपास करून कारवाई होईल. गुन्हा दाखल करण्यासाठी जे अधिकारी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात येईल.रात्रीच्या घटनाक्रमाची चौकशी एसीपी करत आहेत.  जे दोषी आढळतील त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.  एमटीडीसी अधिकारी कुठे आहे याची चौकशी होईल. आरटीओ कडून माहिती घेऊन कारवाई केली जाईल.


दोन आरोपीला ताब्यात घेतले. सोशल मीडियाचे काही व्हिडीओ अमच्याकडे आले आणि काही व्हिडीओ मिळाले आहेत. कोणाला सोडले जाणार नाही.  जो गुन्हा दाखल झाला त्याची तपासणी करू.  संबंधित पोलिस अधिकारी  लांडगे याच्यविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. या विषयी एसीपी तपास करत आहे. त्या रात्री जी घटना घडली त्याचा तपास एसीपी  तपास करतं आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. खासगी गाडी दिवा लाऊन फिरत असेल त्याच्याबाबत ही गुन्हा दाखल केला जाईल. 


कल्याणमधील संपूर्ण प्रकरण आहे तरी काय? 


एमटीडीसीमध्ये कार्यरत असलेला अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत शेजारी-शेजारी राहतात.  नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावत असते. धूप लावल्यामुळे वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात हा धूर जातो. त्यामुळे गीता यांना हा धूर घरात येऊन या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि घरात असलेली वयोवृद्ध आई हिला दम लागतो.  या धुराचा त्रास होतो असं सांगितलं.  मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग  शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना  बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली