एक्स्प्लोर

Nida Khan: निदा खानकडे होती 'मिशन कन्व्हर्जन'ची जबाबदारी? नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात खळबळजनक खुलासा

Nida Khan: नाशिकमधील बहुचर्चित 'TCS' कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Nida Khan: नाशिकमधील बहुचर्चित 'TCS' कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्याकडेच धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. निदा खान सध्या फरार असून पोलीस तिचा राज्यभर शोध घेत आहेत.

मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये निदा खान ही 'वॉन्टेड' आरोपी आहे. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. धार्मिक भावना दुखावणे, गुंगीकारक औषधे देऊन अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे अशा गंभीर आरोपांची टांगती तलवार निदावर आहे. एसआयटीला (SIT) मिळालेल्या पुराव्यांनुसार, निदा केवळ या कटात सहभागी नव्हती, तर तिला विशिष्ट टार्गेट देण्यात आले होते.

Nida Khan: अटकपूर्व जामीन फेटाळला; पोलिसांची मोठी शोधमोहीम

निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्राप्त झालेले पुरावे लक्षात घेता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन फेटाळल्यापासून निदा खान फरार असून, नाशिक पोलिसांची विशेष पथके राज्यभर तिचा शोध घेत आहेत.

Nida Khan: मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता 

2 एप्रिल रोजी एका पुरुष कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तपासादरम्यान तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, निदा खान हिच्या अटकेनंतर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय धागेदोरे किंवा मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली असून, त्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खरात याच्याविरोधात दाखल असलेल्या 9 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र (Charge Sheet) पुढील आठवड्यात न्यायालयात सादर केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरात याच्यावर महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. त्याच्या अटकेनंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न 'एसआयटी' करत आहे. यामध्ये महिला अत्याचाराची 8 प्रकरणे आणि फसवणुकीचे 1 अशा एकूण 9 प्रकरणांचा तपास समावेश आहे. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि नोंदविण्यात आलेल्या जबाबांच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.  

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: धार्मिक कामासाठी अशोक खरातला आधार-पॅन कार्ड दिलं, पण त्याने...; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा ईडी चौकशीत खळबळजनक दावा, काय-काय म्हणाल्या?

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Embed widget