एक्स्प्लोर

Ashok Kharat Case: धार्मिक कामासाठी अशोक खरातला आधार-पॅन कार्ड दिलं, पण त्याने...; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा ईडी चौकशीत खळबळजनक दावा, काय-काय म्हणाल्या?

Ashok Kharat Case: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी ईडी कार्यालयात सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली.

Ashok Kharat Case: समता नागरी सहकारी पतसंस्थेतील मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपला फास अधिक घट्ट केला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांची ईडी कार्यालयात सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावा केलाय. 

Ashok Kharat Case: "धार्मिक कार्यासाठी कागदपत्रे दिली, खरातने केला गैरवापर"

चौकशी दरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की,आपले आणि मुलाचे आधार-पॅन कार्डचे तपशील धार्मिक कामासाठी कॅप्टन खरातला दिले होते. या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने बनावट (बोगस) खाती उघडली, असा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये नॉमिनी (वारसदार) म्हणून खरातचे स्वतःचे नाव असून, खाते उघडताना मोबाईल क्रमांकही खरातचाच वापरण्यात आल्याचा आरोप आहे. 

Ashok Kharat Case: कॉल डिटेल्स आणि मेसेजेसचा 'डेटा' ईडीच्या हाती

प्रतिभा चाकणकर यांनी खरातशी संबंध नसल्याचा दावा केला असला तरी, तांत्रिक तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत प्रतिभा आणि खरात यांच्यात तब्बल 230 पेक्षा जास्त कॉल्स आणि 200 हून अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याचे आढळले आहे. या संवादाची सध्या ईडीकडून कसून पडताळणी सुरू असून, यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Case: 40 लाखांचा संशयास्पद परतावा?

ईडीच्या संशयानुसार, 2021 मध्ये जमा झालेले सुमारे 26 लाख रुपये एका विशेष खात्यात वळवण्यात आले होते. ही रक्कम 2024 पर्यंत तिथेच ठेवून त्यावर तब्बल 40 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत आढळलेली चाकणकर यांच्या नावावरील चार खाती ही खरातने चालवलेल्या 134 संशयित बोगस खात्यांपैकीच एक असल्याचा ईडीला संशय आहे. 

Ashok Kharat Case: पुन्हा चौकशीची शक्यता

दरम्यान, या प्रकरणात केवळ प्रतिभा चाकणकरच नव्हे, तर त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही ईडीने समन्स बजावले आहे. तर अंदाजे 8 तास प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून गरज पडल्यास त्यांना पुन्हा ईडीकडून चौकशीला बोलावले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat : चाकणकरांचा पाय खोलात, 70 कोटींच्या घोस्ट अकाऊंट प्रकरणी ईडीची नोटीस

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget