एक्स्प्लोर

Nida Khan Nashik TCS Case: निदा खानच्या वकिलांनी कोर्टात सतत तेच 'फोकस' ठेवलं; नाशिक कोर्टात काय काय घडलं?

Nida Khan Nashik TCS Case: नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला नाशिक रोड न्यायालयाने 11 मेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nida Khan Nashik TCS Case: नाशिक टीसीएस प्रकरणातील (Nashik TCS Case) आरोपी निदा खानला (Nida Khan) नाशिक रोड न्यायालयाने 11 मेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून निदा खानची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान नाशिक पोलीस काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. धर्मातर प्रकरणात निदाचा प्रत्यक्ष काय रोल होता. 25 मार्चला निदा खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हापासून निदा कुठे होती? कोणाकोणाच्या संपर्कात होती? मुंब्रा, मुंबई, भिवंडी याभागात तिला कोणी आश्रय दिला? मतीन पटेलचा संबंध कधीपासून होता, मतीन पटेल आणि निदा खानची ओळख कशी आणि कोणाच्या माध्यमातून झाली? निदा खानचे मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन काही आहे का?, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं एसआयटी शोधणार आहेत. (Nida Khan Nashik TCS Case)

नाशिक टीसीएस प्रकरणी काल सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपी निदा खान हिचे वकील ॲड राहुल कासलीवाल सतत एकच गोष्टीवर लक्षकेंद्रीत करत असल्याचे दिसून आले. निदा खान गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे निदा खान हिचे वकील ॲड राहुल कासलीवाल यांनी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.  तसेच निदा खान गर्भवती असल्याने तिला किती दिवस पोलीस कोठडी द्यावी, याचा मानवी दृष्टीकोनातून विचार करावा, असं अॅड राहुल कासलीवाल म्हणाले. तसेच निदा खान ही गर्भवती असल्याने पोलिस कोठडीत तिच्या आईला सकाळ-संध्याकाळ भेटण्यास कोर्टान परवानगी दिलेली आहे. बचाव पक्षातर्फे तशी मागणी करण्यात आली होती. (Nida Khan Nashik TCS Case)

काय म्हणाले बचाव पक्षाचे वकील? (Nida Khan TCS Case)

निदाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्याने पोलीस कोठडीची शक्यता आधीपासून होती. बुरखा कुठून आणला हा मुद्दा अनावश्यक असून, बुरखा ही प्रतिबंधित वस्तू नाही, तो कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतो. अॅप डाउनलोड करून लिंक पाठविल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असं निदा खानचे वकील म्हणाले. निदा हिचा मोबाइल आधीच पोलिसांनी जप्त केला असून, त्यातून अजून काय शोधायचे आहे?, असा सवाल निदा खानच्या वकिलांनी उपस्थित केला. तसेच निदा खान गर्भवती असल्याने तिला किती दिवस पोलिस कोठडी द्यावी याचा मानवी दृष्टिकोनातून विचार करावा, असंही निदा खानचे वकील म्हणाले. 

निदा खानवर आरोप काय? (Nida Khan Nashik TCS Case)

  • निदा खानवर धार्मिक भावना दुखावणे हेतूने गुन्हा दाखल
  • पीडित तरुणी आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि धार्मिक भावना दुखावणे यात तिचा थेट संबंध
  • निदा खान आणि दानिश शेख हे दोघे हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करत होते.
  • पीडित महिलांना पुरुष आरोपी अश्लील प्रकार करत होते तेव्हा निदा खान ही त्यांना प्रतिसाद देत असत...
  • पीडित महिला ह्या आरोपींच्या संपर्कात असताना त्यांना अश्लील कृत्य करताना निदा बघ्याची भूमिका घेत...
  • महिला असताना महिलेवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छळवणूक ह्यावर निदा खान कटकारस्थान मध्ये सहभागी होती.
  • धार्मिक भावना दुखावणे, ॲट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे.
  • पीडित महिलांनावर अत्याचार होत असताना कटात सहभागी असल्याचा आरोप देखील निदा खानवर आहे.
  • एकूणच ह्या गुन्ह्यात निदा खानची भूमिका मुख्य सूत्रधारची असल्याने ती इतर आरोपींना गुन्ह्यात मदत करत असल्याचा तपासता उघडकीस आले आहे.

जामीन फेटाळला अन् 'गेम' उलटला- (Nida Khan Nashik TCS Case)

दरम्यान, निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच प्रकरणात अटकेत असलेले इतर आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांचीही चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संग्राम जगताप काय म्हणाले? (Sangram Jagtap On Nida Khan)

टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने मदत केल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी टीकास्त्र सोडले. या लोकांना देशातूनच नाही तर देशाच्या बाहेरून देखील काही लोक मदत करतात. यातूनच या लोकांची हिंमत वाढते, यापूर्वी आम्ही केवळ "लव्ह जिहाद" ऐकत होतो आता "कॉर्पोरेट जिहाद" हा नवीन प्रकार समोर आला आहे. या जिहादला एमआयएमचा एक नगरसेवक नाही तर अनेक लोक मदत करतात. इम्तियाज जलील हा यांचा प्रमुख आहे. जलील नेहमीच या लोकांचं समर्थन करतो. हे राज्याला आणि देशाला अतिशय धोकादायक आहे,  असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातमी:

Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही, काश्मीर फाईल्सप्रमाणेच हे घडतंय; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, इम्तियाज जलील, ओवैसींवर गंभीर आरोप

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
Bhiwandi Crime News: धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Embed widget