एक्स्प्लोर

NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर

NEET Paper Leak : नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटी पूर्णपणे रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट लष्कर आणि वायूदलाची मदत घेतली जाणार आहे.

NEET Re Exam Security : देशभरात सातत्याने गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. आगामी 21 जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सरकारनं थेट भारतीय लष्कराची (Indian Army) मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे, तर देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाची (Indian Air Force) मदत घेतली जाणार आहे. एबीपी माझाशी बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

NEET High Level Meeting : दिल्लीत झाली अत्यंत महत्त्वाची बैठक

नीटच्या फेरपरीक्षेच्या नियोजनासंदर्भात आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय आणि महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे (CBSE) वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील (PMO) काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'एबीपी नेटवर्क'शी खास संवाद साधताना या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली.

Education Ministry Guidelines : परीक्षा 'फुलप्रूफ' करण्यासाठी कठोर उपाययोजना

परीक्षेतील वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. या बैठकीत नीट परीक्षा अधिक पारदर्शक आणि 'फुलप्रूफ' करण्याबाबत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. 

परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा केल्या जाणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. पेपर लीकचा कोणताही मार्ग उरणार नाही, अशा प्रकारे तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाईल. पेपर वाहतुकी दरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठीच वायूदलाच्या विशेष विमानांची मदत घेतली जाणार आहे.

NTA Exam Transparency : विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्याचं आव्हान

नीट परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर जोरदार टीका झाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारींनंतर आता खुद्द गृह आणि संरक्षण यंत्रणा या परीक्षेत लक्ष घालत आहेत. लष्कर आणि वायूदलाच्या थेट सहभागामुळे परीक्षा केंद्रांवर पेपर पोहोचण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत कडेकोट बंदोबस्त असणार आहे. आता 21 जूनच्या फेरपरीक्षेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे.

CBI Investigation Shivraj Motegaonkar : आरोपी मोटेगांवकरच्या बँक लॉकर्सची तपासणी

दुसरीकडे, देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठ्या आर्थिक व्यवहारांची (Money Laundering) जोड मिळताना दिसत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अटक आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची पडताळणी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सुरू करण्यात आली आहे. 

सीबीआयचे पथक या लॉकर्समध्ये मोठी रोख रक्कम, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांची माहिती शोधत आहे. या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज सीबीआयच्या हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget