एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 

Nida Khan Conversion Case : नाशिकच्या टीसीएस (TCS) धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यामागे आणखी कोणाचा हात आहे याचा तपास करावा अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली.

Nashik TCS Conversion Case : नाशिक येथील नामांकित टीसीएस (TCS) कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवून दिली असून या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाल्याचं चित्र आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आणि लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला. इतकंच नव्हे तर या संपूर्ण कटामागे एमआयएमचे (MIM) माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा आरोप करत शिरसाट यांनी त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली. 

Sanjay Shirsat On Nida Khan : निदा खान प्रकरण लहान नाही

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, "हे निदा खान प्रकरण अत्यंत गंभीर असून ते अजिबात लहान नाही. यामागे लव्ह जिहाद, जबरदस्तीने लग्न लावून देणे आणि अशा देशविघातक गोष्टींना मोठ्या प्रमाणावर पैशांचा पुरवठा करणे असे अनेक मोठे धागेदोरे आहेत. निदा खान ही महिला एकटी इतके मोठे कृत्य करूच शकत नाही. नाशिकमधील गुन्हा उघडकीस आल्यानंतर ती आधी मुंब्रा येथे पळून गेली आणि तिथून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आली, जिथे तिला जाणीवपूर्वक लपवण्यात आलं."

गुन्हेगाराला किंवा आरोपीला पाठिंबा देणं आणि त्याला पोलिसांपासून लपवून ठेवणे हा देखील तितकाच मोठा गुन्हा आहे, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव समोर आलं असून मतीन पटेलने चौकशीत थेट इम्तियाज जलील यांचे नाव घेतलं आहे. त्यामुळे जलील हे देखील या कटाचे सूत्रधार असल्याचं दिसत असून पोलिसांनी आता एफआयआरच्या आधारे त्यांची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिरसाट यांनी केली.

तसेच या प्रकरणी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी या प्रकरणातील कोणत्याही दोषीला सोडणार नाही, असं कडक आश्वासन दिल्याचं शिरसाटांनी सांगितलं.

SIT Investigation TCS Case Updates : मतीन पटेलचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू

या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) सध्या युद्धपातळीवर तपास सुरू आहे. निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. सध्या एसआयटीकडून मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि जुना मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचे काम तांत्रिक विभागामार्फत सुरू आहे.

मतीन पटेलच्या फोनवरून संशयास्पद कालावधीत एमआयएमचे मुख्य नेते इम्तियाज जलील यांच्यासह इतर काही बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी थेट संभाषण झाल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.

Nida Khan Conversion Case : कोणाच्या सांगण्यावरून आश्रय दिला? 

निदा खान फरार असताना मतीन पटेलने तिला नेमकं कोणाच्या सांगण्यावरून संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय दिला, याचा शोध आता एसआयटी घेत आहे. मतीन पटेल हा एमआयएमचा सक्रिय नगरसेवक असल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे या रॅकेटशी काय संबंध आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Manteen Patel Nashik Police : मतीन पटेल पुन्हा नाशिक पोलिसांसमोर होणार हजर

या प्रकरणाची संशयाची सुई एमआयएमभोवती फिरत असल्याने पोलिसांनी कारवाईचा पाश आवळला आहे. यापूर्वी नाशिक पोलिसांनी मतीन पटेलची दोन वेळा सखोल चौकशी केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मतीन पटेल हा तपासाच्या पुढील टप्प्यासाठी पुन्हा एकदा नाशिक पोलिसांसमोर हजर होणार आहे. पोलीस या चौकशीत कोणत्या नव्या निष्कर्षावर पोहोचतात आणि इम्तियाज जलील यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget