एक्स्प्लोर

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, SIT तपासात हादरवणारी माहिती

Ashok Kharat: प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने सर्व मोबाईल फोन आणि संबंधित क्रमांकांचा डेटा पुनर्प्राप्त (डेटा रिकव्हरी) करण्याचे काम हाती घेतले आहे.

नाशिक : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधातील तपासात मोठी घडामोड समोर आली असून, गेल्या पाच तासांपासून विशेष तपास पथकाकडून (SIT) त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती उघड होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्राथमिक तपासात अशोक खरात (Ashok Kharat) चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे समोर आले आहे. यापैकी एक क्रमांक हा केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरला जात होता. दुसरा क्रमांक काही विशिष्ट भक्त आणि महिलांशी संवादासाठी वापरला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित कामांसाठी वापरला जात होता, तर चौथा क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने सर्व मोबाईल फोन आणि संबंधित क्रमांकांचा डेटा पुनर्प्राप्त (डेटा रिकव्हरी) करण्याचे काम हाती घेतले आहे. या डेटामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

भोंदू अशोक खरात 4 मोबाईल नंबर अन् कोणता कोणासाठी ते उघड

-1 नंबर फक्त व्हीआयपी (vip) लोकांसाठी वापरत माहिती समोर
- तर दुसऱ्या नंबर हा विशेष काही भक्तांसाठी व महिलांसाठी वापरत असल्याची सूत्रांची माहिती
- तर तिसऱ्या नंबर हा आर्थिक व्यवहार बघण्यासाठी वापरत असल्याची माहिती समोर
-  तर चौथा नंबर हा सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती

महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून खरात... 

अशोक खरात (Ashok Kharat) याची एसआयटीकडून सुरु असलेली चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आयपीएस तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून प्रत्येक दिवशी अशोक खरात (Ashok Kharat) याची कसून चौकशी केली जात आहे. आज (मंगळवारी) सलग 13 व्या दिवशी अशोक खरात याची चौकशी सुरु झाली आहे. अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. यानंतर त्याला पुन्हा पोलीस कोठडीत (Police Custody) पाठवले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्या कोर्टात नेण्यापूर्वी अशोक खरात याच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. यादृष्टीने एसआयटीच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती. त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध (Contraceptive pills ) वापरत असावा, असा दाट संशय पोलिसांना आहे. (Nashik Crime news)

नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता

या संशयामुळे अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमधील काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच महिलांना संमोहित करण्यासाठीही अशोक खरात काही औषधांचा वापर करता होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे एसआयटीकडून बुधवारी न्यायालयात एखादी गंभीर बाब समोर आणली जाण्याची शक्यता आहे. 

उद्या बुधवारी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. सध्या पोलिसांनी अशोक खरात याच्या मोबाईलमधील रिकव्हर झालेल्या डेटाचा तपास सुरु आहे. यामध्ये कॉल रेकॉर्डस आणि Whatsapp चॅटसचा समावेश आहे. त्यादृष्टीने अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची छाननी सुरु आहे. अशोक खरात याच्या मोबाईल डेटावरुन पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. खरातने अनेक  राजकारण्यांचे मोबाईल नंबर कोर्डवर्डमध्ये सेव्ह केल्याची माहिती आहे. या सगळ्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर आगामी काळात अशोक खरात याच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

आणखी वाचा -  Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget