एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकच्या 'त्या' कंपनीत जिहादी रॅकेट? आधी नोकरीचं आमिष दाखवलं, नंतर धर्मांतरासाठी...; तपासात हादरवणारी माहिती

Nashik Crime News: 'स्मार्ट सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात एका नामांकित कंपनीच्या आडून सुरू असलेल्या संतापजनक प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nashik Crime News: 'स्मार्ट सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) शहरात एका नामांकित कंपनीच्या आडून सुरू असलेल्या संतापजनक प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, अशी एक भयानक 'मोडस ऑपरेंडी' येथे राबवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला आणि तरुणींना लक्ष्य केले जात होते. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे: कंपनीतील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी हिंदू देव-देवतांबद्दल सातत्याने आक्षेपार्ह टिप्पणी करत असत. मुस्लिम धर्म हा कसा श्रेष्ठ आहे, असा दावा करून तरुणींचे मत परिवर्तन (Brainwash) करण्याचा प्रयत्न येथे सुरू होता.

Nashik Crime News: कंपनीत जिहादी रॅकेट?

आर्थिकदृष्ट्या गरजू आणि बेरोजगार तरुणींना आधी नोकरीचे आमिष दाखवून कंपनीत भरती केले जाई. त्यानंतर त्यांच्यावर उपकाराचे ओझे टाकून किंवा विवाहाचे प्रलोभन दाखवून लैंगिक अत्याचार केले जात असत. या सर्व प्रकारामागे एखादे संघटित 'जिहादी रॅकेट' सक्रिय असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे.

Nashik Crime News: 9 गुन्हे दाखल 

एका पीडितेने हिंमत दाखवून तक्रार केल्यानंतर नाशिक पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपासादरम्यान एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर आले. केवळ एका तरुणीवर अत्याचार झाला नसून, अनेक तरुणी या षडयंत्राच्या बळी ठरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आता ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nashik Crime News: पाच आरोपींची कसून चौकशी 

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व आरोपी नाशिकमधीलच स्थानिक रहिवासी आहेत. हे आरोपी कोणत्या विशिष्ट कट्टरपंथी संघटनेशी जोडलेले आहेत का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 12 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Nashik Crime News: आमचा धर्म वाढला पाहिजे, हा कसला अट्टाहास? भाजपचा सवाल

दरम्यान, याबाबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण म्हणाले की, नाशिकचं समाजमन अत्यंत अस्वस्थ आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी असं समजू नये की आमच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. आमच्या कामगारांची हवीतशी पिळवणूक करू शकतो. या आस्थापनांमध्ये काम करणारे मॅनेजर, टीम लीडर यांनी कायद्याचे हात आपल्यापर्यंत पोहचणार नाही, या भ्रमात राहू नये. खासगी कंपन्यांमधील एचआरने या प्रकरणाची दखल वेळीच घेतली नाही. म्हणून तिला देखील पोलिसांनी आरोपी केलंय.  आमचा धर्म वाढला पाहिजे, हा कसला अट्टाहास? किती घाणेरडेपणा आहे. जबरदस्तीने मास खाऊ घालणं, हिंदू देवी देवतांचा अपमान केला जातो. छळ करणं, नको तिथे हात लावणे. आमच्या मुली आयटी कंपनीत कामाला जातात.  याचा अर्थ छळाच्या चकचकीत छावण्या नाहीत आणि जेल ही नाही. हा केवळ धर्मांतराचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करणार आहे की, या कंपन्यामधील कामगारांच्या वेळा, कामाचे प्रकार, धार्मिक स्वतंत्रता, मुलींची सुरक्षितता या बाबतीत राज्यात एक धोरण असलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी; सरकारी आणि आरोपीच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, न्यायालयात काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget