एक्स्प्लोर

Nashik Crime News: महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?

Nashik Crime News:नाशिक शहरात एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime News: नाशिक शहरात एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अत्यंत धाडसी पाऊल उचलत, महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेशांतर करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Nashik Crime News: पोलिसांचे 'स्पेशल ऑपरेशन': वेशांतर करून पुरावे गोळा

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच, महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सात महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने कंपनीत वेशांतर करून प्रवेश केला.

या पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले. तसेच, सुमारे 40 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Nashik Crime News: धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा विळखा

तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केले जायचे. 'माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली' असे सांगून महिलांवर उपकाराचे ओझे टाकले जायचे. एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. केवळ महिलांचे शोषणच नाही, तर एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचे उघड झाले आहे. कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते.

Nashik Crime News: पाच जणांना अटक; 10 एप्रिलपर्यंत कोठडी

या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या रॅकेटमधील पाच मुख्य संशयितांना अटक केली आहे

1. आसिफ अन्सारी
2. शफी शेख
3. शाहरुख कुरेशी
4. रझा मेमन
5. तौसिफ अत्तार

न्यायालयाने या पाचही आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nashik Crime News: नाशिकमधील तिसरे मोठे प्रकरण

अशोक खरात आणि रवींद्र एरंडेनंतर नाशिकमध्ये हे तिसरे मोठे प्रकरण समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्येही महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे. या रॅकेटमध्ये अजून किती महिला बळी पडल्या आहेत याचा तपास सुरू आहे.  

आणखी वाचा 

Nashik Crime News: मराठी मुलीनं महिनाभर ‘रोजे’ ठेवले अन् कुटुंबीय हादरले, नाशिकमधील बड्या कंपनीत बळजबरी धर्मांतर; नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget