एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकमध्ये मोबाईलवरुन पत्नीला 'ट्रिपल तलाक'; पती म्हणाला, 'आज से तू हलाल नही, हराम हो गई', गुन्हा दाखल

Nashik Crime News: देशात 'तिहेरी तलाक' ही प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली असतानाही नाशिक शहरात या प्रथेचा जाच अद्यापही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Nashik Crime News: देशात 'तिहेरी तलाक' (Triple Talaq) ही प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवण्यात आली असतानाही, नाशिक (Nashik) शहरात या प्रथेचा जाच अद्यापही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून, तिला अमानुष मारहाण करत गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या एका संशयित पतीविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nashik Crime News: नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मलिक अशरफ समशेर (28, रा. अल्फाद रेसिडेन्सी, पखाल रोड) हा दिंडोरीतील जऊळके येथे भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने पीडितेशी फेब्रुवारी 2022 मध्ये रीतसर नोंदणी (रजिस्टर) पद्धतीने विवाह केला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू असताना, समशेरने शुल्लक कारणावरून पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली.

Nashik Crime News: मारहाणीत बाळाचा मृत्यू अन् फोनवर तलाक

जानेवारी 2025 मध्ये संशयिताने पीडितेला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा फटका इतका गंभीर होता की, पीडितेच्या पोटातील वाढणाऱ्या भ्रूणाचा मृत्यू झाला. यानंतर 30 जानेवारी 2026 रोजी मलिकने पीडितेच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी त्याने अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, "आज से तू हलाल नही हराम हो गई... मैं होश ओ हवास में बोल रहा हूं, तलाक, तलाक, तलाक" असे म्हणत बेकायदेशीररीत्या काडीमोड दिला. इतकेच नाही तर हा संवाद रेकॉर्ड केल्याची धमकीही त्याने पीडितेला दिली.

Nashik Crime News: पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीने कारवाई

पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर शुक्रवारी (दि. 8 मे) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली. आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई नाका पोलिसांना दिले. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण) कायदा 2019 च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?

Jalgaon Crime News: पुण्यातील नांदेड सिटीत सुनेला संपवलं, नंतर घराला कुलूप लावून सासरा पसार; जळगाव पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Embed widget