Nashik Crime News: 'तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू', तरुणींना विश्वासात घेतलं अन्...; नाशिकच्या कंपनीतील धर्मांतराची चक्रावणारी माहिती
Nashik Crime News: नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात आता थक्क करणारी माहिती समोर येत आहे.

Nashik Crime News: नाशिकमधील (Nashik) एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (IT Company) तरुणींचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात आता थक्क करणारी माहिती समोर येत आहे. संशयित आरोपी केवळ तरुणच नव्हते, तर त्यांच्यासोबत काही तरुणीही या 'मास्टरगेम'मध्ये सामील होत्या. "तुला हा विशिष्ट पोषाख छान दिसेल," असे म्हणत तरुणींना विश्वासात घेऊन त्यांचे धर्मांतर करण्याचा डाव या कंपनीत खेळला जात होता.
या प्रकरणातील मुख्य पीडितेच्या वर्तणुकीत झालेले बदल पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. तपासात समोर आले की, संशयितांच्या प्रभावाखाली आलेल्या पीडितेने सलग दोन वर्षे महिना-महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू तरुणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती जाणीवपूर्वक टाळत असे. गेल्या वर्षभरापासून पीडितेने ओठांना 'लिप्स्टिक' लावणेही सोडून दिले होते. तिच्या हिंदू 'टीम लीडर'ने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयितांनी तिच्यावर इतका प्रभाव टाकला होता की तिने कोणाचेही ऐकले नाही.
Nashik Crime News: असा होता धर्मांतराचा कट
आरोपींनी तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी पद्धतशीर नियोजन केले होते. संशयित तरुण स्वतःला अविवाहित असल्याचे सांगून तरुणींशी जवळीक साधायचे. या कटात सामील असलेल्या दोन तरुणी इतर हिंदू मुलींशी चर्चा करून त्यांना विशिष्ट धार्मिक गोष्टींबद्दल सांगायच्या. "तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू," असे म्हणून त्यांना हळूहळू धर्मांतराकडे वळवले जात होते. यासाठी काही वेळा तरुणींवर जबरदस्तीही केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nashik Crime News: 9 गुन्हे दाखल, एचआरची चौकशी
या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात मिळून एकूण नऊ गुन्हे नोंदवले आहेत. यात 8 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. एका पीडितेवर रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुख्य संशयित दानिश हा विवाहित असूनही त्याने पीडितेशी लग्नाचे खोटे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले. गुन्हे दाखल होताच पसार झालेल्या कंपनीच्या एचआर आश्विनी चैनानीला एसआयटीने (SIT) ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्यानंतर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
आणखी वाचा



















