Nagpur Crime News: नागपुरात लोकल तेलाच्या डब्ब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असल्याचा गोरखधंदा पोलीस कारवाईनंतर उघडकीस आला आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अदानी विलमार कंपनीच्या अधिकऱ्यानी त्यांच्या कंपनीचे स्टिकर लावून नागपूर आणि परिसरातील काही तेल विक्रेते ग्राहकांची फसवणूक (Nagpur Crime) करत असल्याची तक्रार केली होती. जेव्हा पोलिसांनी हुडकेश्वर परिसरात एका गोदामावर छापा घालत कारवाई केली, तेव्हा खुले विकले जाणारे तेल हे डब्ब्यात भरले जात होते. त्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावले जात होते.
7 लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपीला बेड्या
या प्रकरणी पोलिसांनी बनावट लेबल लावलेले 28 तेलाचे डब्बे, शेकडो कागदी लेबल्स, पॅकिंग मशीन, तेलाचे डब्बे भरण्यासाठी मोटार पंप, पॅकिंग पट्टी रोल असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करत निलेश साहू या आरोपीला ही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, बनावट आणि कमी दर्जाचा तेल ब्रँडेड सांगून विक्रीचा हा गोरखधंदा मागील किती वर्षांपासून सुरू होता, नागपूरच्या विविध गोदामामध्ये आणखी किती साहित्य पडलेले आहे? हे तेल कुठे तयार केले, त्याच्या विक्रीच्या मालिकेत कोण कोण विक्रेते सामील आहे? याचा शोध पोलीस आता घेणार असल्याची माहिती नागपूर क्राइम ब्रांचचे सहाय्यक आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
डिझेल घेऊन जाणाऱ्या मालगाडीतील एका डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली
नागपूर रेल्वे स्थानकावर पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या मालगाडीतील एका डब्यात (वॅगन) अचानक आग लागल्याने काही वेळासाठी खळबळ माजली होती. रविवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास मालगाडीतील एका वॅगनमधून निघालेल्या आगीमुळे फलाटाच्या शेडला ही काही अंशी आग लागल्याने मोठा धूर निघाला होता. यावेळी शेजारच्या फलाटावर तेलंगाना एक्सप्रेस उभी होती. त्यामुळे त्या गाडीतील प्रवाशांमध्ये खळबळ निर्माण झाली. मात्र रेल्वे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच आरपीएफच्या जवानांनी दक्षता घेत वेळीच आग विझवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
इतर महत्वाच्या बातम्या