MS Dhoni IPL 2025 Chennai Super Kings Schedule : बीसीसीआयने रविवारी (16 फेब्रुवारी) आयपीएलच्या अठराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगची सुरुवात कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता विरुद्ध बंगळुरू यांच्या सामन्याने होईल. या  हंगामातचे सामने एकूण 13 ठिकाणी होणार असून, एकूण 74 लढतींचा थरार रंगेल. यंदाचा अंतिम सामनाही इडन गार्डन्स स्टेडियमवरच होईल.


पण आयपीएल 2025 चा मोठा सामना 23 मार्च रोजी खेळला जाईल, जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. एमएस धोनी देखील चेन्नईकडून खेळणार आहे, परंतु ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करताना दिसतील. चला तर मग एक नजर टाकूया, आयपीएल 2025 मधील सीएसकेच्या संपूर्ण वेळापत्रकावर आणि एमएस धोनी कोणत्या संघाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळणार आहे.  कारण असे बोलले जात आहे की, महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो, वय जास्त झाल्यामुळे तो निवृत्ती जाहीर करणार आहे.






चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध असेल आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा दुसरा सामना 28 मार्च रोजी आरसीबीविरुद्ध असेल. लीग टप्प्यात सीएसके संघ 7 सामने घरच्या मैदानावर आणि उर्वरित सात सामने प्रतिस्पर्ध्याच्या घरच्या मैदानावर खेळेल. गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून हुकली होती. चेन्नईचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना 18 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध असेल. जो महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सामना असू शकतो. पण जर चेन्नई क्वालिफाय झाली तर गोष्टी वेगळ्या असू शकतात.  


जयपूरमध्ये खेळणार नाही धोनी!


यंदाच्या हंगामात प्रत्येक आयपीएल संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सात सामने खेळतो. राजस्थान रॉयल्स कडे जयपूर आणि गुवाहाटी ही दोन होमग्राउंड आहेत. अशा परिस्थितीत संघ आपले 2 सामने गुवाहाटीत आणि 5 सामने जयपूरमध्ये खेळेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे चाहते त्यांना जयपूरमध्ये खेळताना पाहू शकतील. पण यावेळी महेंद्रसिंग धोनीचे चाहते त्याला जयपूरमध्ये आयपीएल खेळताना पाहू शकणार नाहीत. कारण यावेळी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे.


IPL 2025 मधील चेन्नई सुपर किंग्जचं संपूर्ण वेळापत्रक



  • 23 मार्च - चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस (CSK vs MI)

  • 28 मार्च - चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (CSK vs RCB)

  • 30 मार्च - चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)

  • 5 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC)

  • 8 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (CSK vs PBKS)

  • 11 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स (CSK vs KKR)

  • 14 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स (CSK vs LSG)

  • 20 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस (CSK vs MI)

  • 25 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs सनराइजर्स हैदराबाद (CSK vs SRH)

  • 30 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (CSK vs PBKS)

  • 3 मे - चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (CSK vs RCB)

  • 7 मे - चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स (CSK vs KKR)

  • 12 मे - चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)

  • 18 मे - चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्स (CSK vs GT)