Nagpur News : नागपुरच्या जाफर नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री उशिरा अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही. 

Continues below advertisement


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि एकमेकांना भेटण्याचं ठरलं. नागपुरातील रविनगर परिसरातून तो तरुण त्या मुलीला बाईकवर जाफर नगर परिसरात घेऊन गेला होता. तिथे एका फ्लॅटमध्ये त्यानं अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्यानं मुलीला गुंगीचं औषधही दिलं होतं. तरुणानं आपल्या काही मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांनाही त्याठिकाणी बोलवून घेतलं. आरोपीच्या काही मित्रांनीही आळीपाळीनं मुलीवर बलात्कार करुन तिचं शारीरिक शोषण केलं.  


दरम्यान, ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. मात्र काल मुलीची तब्येत बिघडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेलं आणि ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात चार तरुणांना आरोपी बनविण्यात आलं आहे. सध्या चारही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha