Sachin Vaze Update :

  मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. सचिन वाझेनं या संदर्भात  ईडीला (ED) पाठवलं लेखी पत्र पाठवलं आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेची तयारी असल्याची माहिती आहे. वाझेंच्या या अर्जसंदर्भात ईडी 14 फेब्रुवारीला कोर्टात आपली भूमिका मांडणार आहे.


सचिन वाझेला झटका, जबाब बदलण्याचा अर्ज चांदीवाल आयोगानं फेटाळला


निलंबित आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची (Chandiwal Commission) स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझेनी अनिल देशुमख यांना उलट तपासणीसाठी क्लीन चीट दिली होती. मात्र, आता सचिन वाझेनं आपल्या जबाबात बदल करण्याचा अर्ज केलं होतं. सचिन वाझेचा हा अर्ज आयोगानं फेटाळून लावलाय. तुम्हाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे द्यावे लागले होते का? असा प्रश्न आयोगानं त्यावेळी वाझेना विचारला होता. या प्रश्नावर वाझेनी 'नाही' असं उत्तर दिलं होतं. मात्र, आता त्यांनी न्यायालयाकडे केलेल्या अर्जात 'हो' असा बदल करण्याची विनंती केली आहे. 


अनिल देशमुख यांच्या वैयक्तिक कर्मचार्‍यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीनं तुमच्याकडं कधीही पैशांची मागणी केली नाही, असे म्हणणे योग्य ठरेल का? असा प्रश्न आयोगानं विचारला होता. त्यावेळी वाझेचं उत्तर नाही होत. पंरतु, आता त्यांना या जबाबामध्ये बदल करायचा आहे. "अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक त्यांच्या वतीनं माझ्याकडे पैसे मागायचे. मला अनिल देशमुख आणि त्यांच्या लोकांकडून पैसे घेण्यास सांगितले गेले", असं वाझेनं अर्जात नमूद केलंय. 


सचिन वाझेला या दोन प्रश्नात बदल करायचा आहे की, कारण त्यानं या प्रश्नांची उत्तरे आधी दबावाखाली दिली होती. तसेच अनिल देशमुख यांनी माझा मानसिक छळ केला. राजीनामा दिल्यानंतरही मला त्रास देत होते. यामुळं सर्व कारणांमुळेच त्यांनी पोलीस कोठडीला कोणताही विरोध केला नसल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता. अनिल देशमुख हे नेहमी माझी काळजी घेतील आणि मला सुरक्षित ठेवतील असं मला वाटत होतं, असंही वाझेनं म्हटलं आहे. 


आजही देशमुखांचा माझ्या आयुष्यावर, माझ्या भविष्यावर आणि माझ्या आजूबाजुला घडणाऱ्या किंवा माझ्याशी संबंधित घटनांवर प्रभाव झाला. मुंबई पोलीस आयुक्तांनी 22 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्या तीन चुलत भावांना निलंबित केलं. आपल्यावर कशाप्रकारचा दबाब आणला जातो हे यावरून स्पष्ट होतंय, असंही सचिन वाझेनं म्हटलं आहे.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha