Nagpur Crime News: आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या एमआयडीसी (MIDC) आता देहव्यापाराचा (Sex Racket) अड्डा बनली आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे. बुटीबोरी येथील एमआयडीसीत बंद असलेल्या एका कंपनीमध्ये चक्क देहव्यापार (Nagpur Crime) सुरू असल्याचा प्रकार पोलिसांनी (Nagpur Police)उघड केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत देहव्यापार करणाऱ्या दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे. तर यातील मुख्य संशयित महिला आरोपीस अटक केली आहे.


पकडण्यात आलेल्या संशयित महिला आरोपी विरुध्द पोलिसांनी कलम 3, 4 आणि 5 स्त्रीया व  मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1965 अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे. तर यातील पिडीत दोन महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे देहव्यापार करणाऱ्या टोळीने आता आपला मोर्चा पंचतारांकित अशा एमआयडीसीकडे वळवला आहे का, हा प्रश्न देखील या निमित्याने निर्माण झाला आहे.  


बंद कंपनी बनली चक्क देहव्यापाराचा अड्डा


उपराजधानी नागपूर शहराच्या वेशीवर असलेले बुटीबोरी येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. या एमआयडीसी मधील बहुतांश मोठमोठे प्लॉट हे सध्या रिकामे आहेत. तर अनेक कंपन्या एकतर बंद आहेत किंवा तिथे असलेले शेड्स रिकामे आहेत. शिवाय या ठिकाणी नागरिकांचा देखील फार वावर नसल्याने, याच संधीचा फायदा घेत हा परिसर काही गुन्हेगार आणि असामाजिक तत्वांचा अड्डा बनले असल्याची दाट शक्यता बळावली आहे. अशाच एका कृत्याचा भांडाफोड एमआयडीसी पोलिसांनी केला आहे. बुटीबोरी पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, गेल्या काही दिवसांपासून एक महिला स्वतःच्या आर्थीक फायद्याकरिता काही महिलांकडून देहव्यापार करून घेत आहे. त्याकरिता या महिलेने एमआयडीसी परिसरातील बंद एएन इंजिनीअरिंग कंपनीच्या जुन्या हॉलचा वापर केला. यासाठी अनेक गरजू महिलांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांना पैशाचे आमिष देत विश्वासात घेऊन या महिलेने देहव्यापार करण्यास त्यांना प्रवृत्त केले. मिळालेले या गुप्त माहितीच्या आधारे  एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सापळा रचत या घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या छुप्या कारवाई मध्ये येथील सत्य समोर आले.


महिलेविरुद्ध गुन्हा दाखल 


पोलिसांनी या प्रकरणी मुख्य महिलेले अटक करून कलम 3, 4 आणि 5 स्त्रीया व  मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1965 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तर या कारवाईतील पिडीत दोन महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई  पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस स्टेशन बोरी येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, पोउपनि राम खोत, पोलीस अंमलदार दिप पांडे, संतोष तिवारी, श्रीकांत गौरकार, निशा हंबरे यांच्या पथकाने केली. 


इतर महत्वाच्या बातम्या