Varsova Crime : मित्रचं बनला वैरी! गांजा पिण्याच्या वादातून एकाची हत्या, वर्सोवा पोलीसांकडून आरोपीला अटक
Varsova Murder : क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना मुंबईतील वर्सोवा येथे घडली आहे. गांजा पिण्याच्या वादातून मित्रानेच मित्राचा केल्याचं समोर आलं आहे.
Varsova Murder : क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना मुंबईतील वर्सोवा येथे घडली आहे. गांजा पिण्याच्या वादातून मित्रानेच मित्राचा केल्याचं समोर आलं आहे. वर्सोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वर्सोवा पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुणाला त्याच्याच जवळच्या मित्रावर पेव्हर ब्लॉकने हल्ला करून ठार मारल्याप्रकरणी अटक केली आहे. मृताचं नाव सूरज तिवारी (वय 24 वर्ष) असं आहे. सुरजसोबत गांजा पिण्यावरुन झालेल्या वादातुन रागाच्या भरात सूरजची हत्या केल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे बस डेपोच्या आवारात 24 जुलै रोजी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहचलं. यावेळी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे बारकाईने निरक्षण केले असता मृत इसमाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने व्यक्तीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आजूबाजुच्या परिसरामध्ये चौकशी केली असता मृत तरुणाचं नांव सुरज मनोज तिवारी वय 24 वर्षे असल्याचे समजलं.
या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली आहे की, मृत सूरज तिवारी हा सुमारे दिड वर्षापूर्वी दिल्लीवरुन मुंबईत आला होता. त्याला नोकरी धंदा नसल्याने तो सातबंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई परिसरातच गुरुदवारामधील लंगर किंवा इतर मोफत जेवण मिळणाऱ्या ठिकाणी जावून जेवत असे आणि फुटपाय अथवा बी.एस.टी बस डेपोच्या आवारात झोपत असे. त्याला दारू आणि गांजा पिण्याचं व्यसन होतं.'
पोलिसांनी त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांकडे अधिक चौकशी केली असता मोनूनावाच्या साथीदाराने त्याचा खून केला असल्याचे आणि तो पळून गेला असल्याचे निष्पन्न झालं. तसेच मोनू हा काही दिवसापूर्वीच या ठिकाणी आला होता. त्यामुळे त्याचे पूर्ण नांव अथवा त्याचा पत्ता कोणालाही माहित नव्हता. मोनूलाही गांजाचं व्यसन होतं. पोलिसांनी वेगवेगळे चार पोलीस पथके तयार केली आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. लावून आरोपी मोनुकुमार शिवनारायण सिंह (वय 22) याला वर्सोवा पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाने सापळा लावून शिताफीने पकडलं.