मुंबई : घरात सिरीअल बघू देण्यास नकार दिल्याने झालेल्या दोन बहिणीच्या वादात 17 वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी कळवा येथील रेतीबंदर खाडीत एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह याच मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ती मुलगी मुंब्रा येथील संजय नगर मधील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव सायमा सलमानी होते. तर तिच्या वडिलांचे नाव अश्फाक सलमानी आहे. अश्फाक यांनीच पोलिसांना घरी घडलेली घटना सांगितली. सायमा मुंब्रा परिसरातील संजयनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत गेली अनेक वर्षे राहत होती. काल दुपारी सायमा मोबाईलवर सिरीअल बघत होती, त्यावेळी तिच्या बहिणीने मार्केटमध्ये जाण्यासाठी मोबाईल घेतला. यावरून त्यांच्यात मोठे भांडण झाले. तिची बहीण संध्याकाळी 4 च्या आसपास मार्केटमधून परत आली त्यावेळी सायमा घरी नव्हती. तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर रेतीबंदर खाडीत संध्याकाळी एका मुलीचा मृतदेह स्थानिक 2 मुलांना आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी जाऊन तो मृतदेह बाहेर काढला.
या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सायमाच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले. त्यांनी तो मृतदेह सायमाचा असल्याची असल्याची ओळख कालवा पोलिसांनी पटविल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दोन्ही बहिणीत झालेल्या वादानंतर सायमा हिने रागाच्या भरात मुंब्रा येथील चुहा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्रार्थमिक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या :