मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 763  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 67  हजार 791  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 
 
राज्यात आज 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 929  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (1),  धुळे (3), जालना (37), परभणी (87), हिंगोली (16), नांदेड (09),  अकोला (22), वाशिम (07), बुलढाणा (01), नागपूर (97), यवतमाळ (05),  वर्धा (6), भंडारा (1), गोंदिया (1),   गडचिरोली (33 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 33 हजार 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,39,760 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,416  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 96,19, 637 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4519 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1131 दिवसांवर गेला आहे. 


गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


 देशातील कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरी धोका अद्याप टळलेला नाही. सध्याच्या देशातील सक्रिय रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण केरळातील आहेत. आरोग्य मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासांत 24770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अडिच लाखांहून कमी झाली आहे. देशात सध्या 2,46,687 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.  आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही 203 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. यापूर्वी मंगळवारी कोरोनाच्या 18 हजार 346 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.