मुंबई :  मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 629 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22, 636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 16 हजार 136 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.


मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4519 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1131 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 48 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन  नाही.


 






 कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 763  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 67  हजार 791  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. राज्यात आज 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 929  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (1),  धुळे (3), जालना (37), परभणी (87), हिंगोली (16), नांदेड (09),  अकोला (22), वाशिम (07), बुलढाणा (01), नागपूर (97), यवतमाळ (05),  वर्धा (6), भंडारा (1), गोंदिया (1),   गडचिरोली (33 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.राज्यात सध्या 33 हजार 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.