मुंबई : अल्पवयीन मुलीला फ्लॅट मालकाने 35,000 रुपये चोरताना पकडले होते. त्यानंतर संबंधित मुलीला दोषी वाटल्याने तिने बाल्कनीतून उडी घेतली आणि तिचा मृत्यू झाला. या आत्महत्येप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. एका अल्पवयीन मुलाला त्यांच्या घरी कामावर ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी फ्लॅट मालकावर बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास आत्महत्येची घटना घडली. नागपाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत तरूणी गेल्या15 दिवसांहून अधिक काळ उंच इमारतीच्या 16 व्या मजल्यावर काम करत होती. ती तिथेच काम करून रात्री मालकाच्या घरी राहायची. तर तिचे कुटुंब अँटॉप हिलमध्ये राहायचे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बुधवारी ही मुलगी कुटुंबासह कोलकात्याला जात होती. त्यानुसार तिची आई तिला तिच्या मालकाच्या घरून आणण्यासाठी गेली असता त्याच सुमारास मालकाच्या मुलीची पर्स गायब झाली. जेव्हा ती पर्स सापडली तेव्हा ती बॅगमध्ये होती. असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमैयाची आई घटनास्थळी हजर होती म्हणून घरमालकाने तिला माहिती दिली. यावर मुलीच्या आईने तिच्या चुकीच्या कृत्याबद्दल तिला फटकारले. त्यानंतर सुमैया पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेली आणि त्यानंतर तिने बाल्कनीतून उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.
नागपाडा पोलिसांनी घर मालकावर आणि त्याच्या पत्नीवर बालकामगार कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत 16 वर्षांच्या मुलीला त्यांच्या घरी काम करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :