एक्स्प्लोर

CBI: मोठी कारवाई! भारतीय तरुणांना परदेशात विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार 'कृष'ला मुंबईतून अटक

CBI: म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर या तरुणांना अक्षरशः कैदेत ठेवले जायचे. तिथे त्यांना खालील गुन्हे करण्यासाठी जबरदस्ती केली जायची.

मुंबई: भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सीबीआयने (CBI) छडा लावला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘कृष’ याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सुनील हा म्यानमारमधील कुख्यात सायबर फसवणूक केंद्रांमध्ये भारतीयांना गुलाम म्हणून विकण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर आहे. तिथे त्यांना जबरदस्तीने “डिजिटल अरेस्ट”, रोमांस फ्रॉड आणि क्रिप्टो फसवणूक करण्यात लावले जात होते. पीडितांना कैदेत ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

काय आहे हे 'नोकरी' रॅकेट?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट भारतातील सुशिक्षित तरुणांना थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवायचे. पीडितांना आधी दिल्ली आणि तिथून बँकॉकमार्गे विमानाने नेले जायचे. मात्र, थायलंडला पोहोचल्यानंतर त्यांना रस्तेमार्गे गुपचूप म्यानमारमधील 'म्यावाडी' (विशेषतः KK पार्क) परिसरातील सायबर गुन्हेगारी केंद्रांमध्ये नेले जात होते.

कैदेत ठेवून 'डिजिटल अरेस्ट' आणि छळ

म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर या तरुणांना अक्षरशः कैदेत ठेवले जायचे. तिथे त्यांना खालील गुन्हे करण्यासाठी जबरदस्ती केली जायची, भारतातील लोकांना फोन करून पोलीस असल्याचे भासवून लुटणे. सोशल मीडियावरून प्रेमाचे नाटक करून फसवणूक करणे. गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांचे पैसे लाटणे. या कामाला नकार देणाऱ्या पीडितांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे.

२०२५ मध्ये सुटका आणि तपासाला गती

या नरकातून २०२५ मध्ये काही पीडितांनी जिवावर उदार होऊन पळ काढला. थायलंडमार्गे भारतात परतल्यानंतर त्यांनी आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून सीबीआयने तपासचक्र फिरवले आणि सुनील उर्फ कृष याची या प्रकरणातील मुख्य भूमिका उघडकीस आणली.

मुंबईतून अटक आणि पुरावे जप्त

सुनील कृष हा नुकताच मुंबईत परतल्याची माहिती मिळताच सीबीआयने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून या रॅकेटमध्ये आणखी किती मोठे मासे अडकले आहेत, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध CBI घेत आहे.

"मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सीबीआयने या बेकायदेशीर कृत्यांमागील मुख्य सूत्रधारांची ओळख पटवण्यासाठी अत्यंत सखोल आणि बारकाईने तपास केला. या मानवी तस्करीच्या जाळ्यात 'कृष' हा एक प्रमुख दलाल आणि किंगपिन (मुख्य सूत्रधार) म्हणून समोर आला आहे. दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये पीडितांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांचे शोषण करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या आरोपीच्या हालचालींवर सीबीआयची सतत नजर होती. तो नुकताच भारतात परतल्यानंतर सीबीआयने त्याला मुंबईतून अटक केली आहे."

कृषच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली असून, तिथे म्यानमार आणि कंबोडियामधील मानवी तस्करीच्या ऑपरेशन्सशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत."या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या जाळ्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा आणि विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी तसेच या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, याचा उलगडा करण्यासाठी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे," असे यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget