Mumbai : मुंबईतील (Mumbai) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृंदावन सोसायटीतील रहेजा टाऊनशिप, मालाड पूर्व, येथे राहणाऱ्या कृष्णमूर्ती व्यंकटरमणी या 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करण्यात आली. केवायसी (KYC) अपडेट करण्यासाठी अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना एक संदेश प्राप्त झाला. त्या संदेशात केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवली होती. सदर तक्रारदार यांनी सदर लिंक ओपन करून त्यामध्ये त्यांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती भरली असता त्यांचे खात्यातून 91,200 रूपये डेबिट झाले. 


या घटनेसंबंधित तक्रारदार कृष्णमूर्ती व्यंकटरमणी यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीने 91,200 रूपये डेबिट झाल्याबाबत सायबर कक्षास तक्रार दिली होती. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पाेलिस उपआयुक्त परिमंडळ 12, सोमनाथ घार्गे, सहायक पाेलिस आयुक्त, दिंडोशी विभाग, मुंबई संजय पाटील आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस जीवन श्रीरंग खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी सपोनि विजय पवार यांनी तपास केला आहे. 


सदर फ्रॉड ट्रांझेक्शनची माहिती लक्षात घेऊन सदरबाबत तात्काळ HDFC बॅंकेचे नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधून, पत्र व्यवहार करून कृष्णमूर्ती व्यंकटरमणी या तक्रारदारांची संपूर्ण रक्कम त्यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.     


सध्या ऑनलाईन गुन्हेगारीची, फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे तुम्हाला अनोळखी नंबरवरून कोणताही मेसेज आल्यास त्याची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. तसेच संबंधित बॅंक खात्याशी वेळीच संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या :