Oppo India Tax : आणखी एका चिनी मोबाइल कंपनीवर छापा मारण्यात आला आहे. चिनी मोबाइल कंपनी  Oppo Mobiles वर करचोरीचा ठपका ठेवण्याच आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DIRECTORATE OF REVENUE INTELLIGENCE)  ही कारवाई केली आहे. Oppo India मोबाइल कंपनीने 4389 कोटींची कस्टम ड्युटी बुडवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. Oppo India कंपनी  मोबाइल हँडसेटचे उत्पादन, मोबाइलमधील सुट्टे भाग जोडणे (Assembling), घाऊक व्यापार आणि मोबाइल फोन विक्रीशी संबंधित आहे. Oppo India वेगवेगळ्या ब्रॅण्डने मोबाइल फोनची विक्री करत आहे,. यामध्ये Oppo, OnePlus आणि Realme चा समावेश आहे. Oppo India कंपनीला 4389 रुपयांची कस्टम ड्युटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याशिवाय, नोटीसमध्ये Oppo Indiaच्या कर्मचाऱ्यांवर आणि ओप्पो चीनवर पेनल्टी लावण्याचा प्रस्ताव आहे. 


अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो मोबाइल हे Oppo India च्या नावाने ओळखले जातात. Oppo India विरोधात DRI कडून चौकशी सुरू होती. यामध्ये 4389 कोटींची करचोरी समोर आली आहे. या तपासादरम्यान DRI ने Oppo India चे कार्यालय आणि व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या काही प्रमुख व्यक्तिंच्या घराची झडती घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे दस्ताऐवज सापडले आहेत. या दस्ताऐवजांनुसार, Oppo Indiaने मोबाइल फोनच्या उत्पादनाशी निगडीत काही वस्तूंच्या आयातीबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे Oppo India ला चुकीच्या पद्धतीने 2981 कोटींच्या कराची सवलत मिळाली. DRI ने केलेल्या चौकशीत कस्टम अधिकाऱ्यांना आयाती दरम्यान चुकीची माहिती दिली असल्याचेही समोर आले आहे. 


Oppo India ने तंत्रज्ञान, ब्रॅण्ड, आयपीआर परवान्याचा वापर करून चीनमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांना रॉयल्टी आणि परवाना शुल्क भरण्याची तरतूद केली होती. ओप्पो इंडियाने भरलेली रॉयल्टी आणि परवाना शुल्क आयात केलेल्या वस्तूंच्या व्यवहार मूल्यामध्ये जोडले जात नव्हते. ही बाब म्हणजे कस्टम ड्युटी चुकवण्याचा प्रकार आहे. 


Oppo India चे स्पष्टीकरण


चिनी मोबाइल कंपनी  Oppo Mobiles वर करचोरीचा ठपका ठेवण्याच आला आहे. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. ओपो India कंपनीला  महसूल गुप्तचर संचालनालयाने (DIRECTORATE OF REVENUE INTELLIGENCE) जी नोटीस पाठवली आहे त्या नोटिसीला आम्ही उत्तर देणार आहे. आम्ही आमची बाजू मांडणार आहे. कंपनी या प्रकरणी सर्व गोष्टी कायद्याने करणार आहे