Mumbai Crime News : संपत्ती आणि पैशांचा वाद माणसांमध्ये माणूस ठेवत नाही. रक्ताच्या नात्यांमध्ये पैसा आणि संपत्तीसाठी दुरावा निर्माण होतो. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. अशाच एका वादातून मुलानंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत समोर आली आहे. मुलुंडमध्ये एक 22 वर्षीय तरुणाने स्वतःच्या आईची हत्या करून लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. छाया महेश पांचाळ असे 46 वर्षीय मयत महिलेचे नाव असून तिची हत्या तिचाच 22 वर्षीय मुलगा जय याने केली आहे. मुलुंडच्या वर्धमान नगर मध्ये पांचाळ कुटुंबीय राहतं. आज संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांचा घरातून रक्त येत असल्याचा कॉल प्राप्त झाला.
या वेळी मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत मृत पडलेल्या आढळल्या. यावेळी पोलिसांना एक गुजराती भाषेत चिठ्ठी देखील आढळली. जी छाया यांचा मुलगा जय याने लिहिली होती.यात त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरुन हे दोघे माता-पुत्र डिप्रेशनमध्ये असल्याचे छाया यांच्या पतीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या
Nagpur Sextortion : नागपूरचा अधिकारी सेक्सटॉर्शनला बळी; 28 लाखांची रक्कम उकळताना आरोपी ताब्यात
Aurangabad Crime: कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 50 जनावरांची सुटका; पोलिसांची कारवाई
Crime News : मुंबई-नाशिक महामार्गावर स्कॉर्पिओ कारमधील हत्येचा उलगडा; आर्थिक वादातून भीषण कृत्य
सोन्याच्या व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी करायचा घरफोडी, मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या