Mumbai Kurla Firing News : मुंबईतील (Mumbai News) कुर्ला (Kurla) पश्चिममध्ये काल (सोमवारी) गोळीबाराची (Firing in Kurla) घटना घडली आहे. मुंबई पालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदारावर दोन अज्ञातांकडून गोळीबार (Firing by Unknowns) करण्यात आला. कामावरुन घरी परतत असताना अचानक दोन अज्ञातांनी गाडीवर गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. 


कुर्ला पश्चिममध्ये (Kurla West) अज्ञात हल्लेखोरांकडून बीएमसी कंत्राटदाराच्या (BMC Contractor) गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. सूरज प्रतापसिंह असं कंत्राटदाराचं नाव असून सुदैवानं ते सुखरुप आहेत. गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. 


काय घडलं? 


मुंबईतील कुर्ल्यात सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कुर्ल्यातील कपाडीया नगर येथे महानगरपालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करणारे सूरजप्रताप सिंह कामावरुन घरी परतत होते. काम आटपून कुर्ल्याहून ते बोरीवलीला असलेल्या आपल्या राहत्या घराच्या दिशेनं निघाले. आपल्या इनोव्हा क्रिस्टा गाडीनं त्यांनी प्रवास सुरू केला. एवढ्यातच कपाडीया जंक्शनजवल त्यांची गाडी पोहोचताच दोन अज्ञात इसम त्याठिकाणी आले आणि त्यांनी सूरज प्रतापसिंह यांच्या गाडीवर गोळीबार केला. काही राऊंड फायरिंग केल्यावर दोन्ही अज्ञात इसमांनी तिथून पोबारा केला. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. सूरज प्रतापसिंह आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही सुखरुप आहेत. घटनेनंतर सूरज प्रतापसिंह यांनी पोलीस स्थानक गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. 


पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून लवकरात लवकर अज्ञात गोळीबार करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


गोवा गुटखाचे मालक जे एम जोशी यांना 10 वर्षांची शिक्षा; दाऊदला पाकिस्तानात  व्यवसाय सुरू करण्यात मदत केल्याचा आरोप