Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हृतिकच्या नृत्याचे अनेक जण दिवाने आहेत. हृतिकचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


पहिलाच सिनेमा सुपरहिट!


हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' (Kaho Naa Pyaar Hai) हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. एकीकडे सिनेमाला यश मिळत असताना दुसरीकडे मात्र हृतिकला अश्रू अनावर झाले होते. सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर हृतिक त्याच्या रुममध्ये पाच दिवस रडत बसला होता. त्यावेळी त्याला आपण सिनेसृष्टीत पदार्पण करुन चूक केली असं त्याला वाटत होतं. 


हृतिकचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत झाला. त्याचे वडील राकेश रोशन हेदेखील सिने-दिग्दर्शक होते. तसेच त्याची आई पिंकीदेखील निर्माती होती. त्यामुळे त्याला घरातच अभिनयाचा वारसा मिळाला. 'कहो ना प्यार है' हा हृतिकचा पहिला सिनेमा असला तरी तो 1980 साली 'आशा' या सिनेमात बाल कलाकार म्हणून झळकला आहे. 




हृतिक रोशनला पहिल्याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याला 2003 साली 102 पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सर्वाधिक पुरस्कार मिळाल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली. दुसरीकडे त्याचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. 


हृतिक रोशनचे गाजलेले सिनेमे (Hrithik Roshan Popular Movies) : 


आशा 
भगवान दादा 
खुदगर्ज 
कहो ना प्यार है 
फिजा 
मिशन कश्मीर 
कभी खुशी कभी गम 
आप मुझे अच्छे लगने लगे 
ना तुम जानो ना हम 
मुझसे दोस्ती करोगे 
कोई मिल गया 
लक्ष्य
धूम 2 
जोधा अकबर 


संबंधित बातम्या


Hrithik Roshan : गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन परदेशात रवाना; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल